Pope Francis' health deteriorates again; Two serious attacks
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णलायात आहेत. सध्या त्यांची प्रकृतीत पुन्हा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पोप यांना श्वसनाच्या समस्या उद्भवत आहेत. तसेच त्यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाशी लढ देत असताना त्यांना दम्याचा त्रास होत आहे. व्हॅटिकनच्या दिलेल्या माहितीनुसार, सोमवरी (03 मार्च) पोप दोन गंभीर झटके आले. त्यांच्या फुफ्फुसात एंडोब्रोन्कियल म्यूकस असल्याने त्यांना श्वसनसंस्थेत अडथळा निर्माण झाला आहे आणि त्यांना श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला.
डॉक्टरांना फुफ्फुसातील श्लेष्मा काढण्यासाठी दोनदा ब्रॉन्कोस्कोपी करावी लागली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ठीक होण्याची बातमी समोर आली होती मात्र, आता पुन्हा एकदा श्वसनाच्या आजाराने पोप त्रस्त आहेत.प्रकृती गंभीर असली तरी वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान पोप फ्रान्सिस डॉक्टरांचे सूचनांचे पालन करत असल्याने पूर्णपण शुद्धीवर आहेत.
व्हॅटिकनने जारी केलेल्या निवेदनुसार, पोप फ्रान्सिस सोमवारी (03 मार्च) विश्रांती घेत असताना अचानक त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर डॉक्टारांनी काही वेळानंतर वैद्यकीय उपचार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या त्यांच्या प्रकृतीतवर लक्ष्य ठेवले आहे.
पोप फ्रान्सिस यांची स्थिती
पोप फ्रान्सिस यांच्या उत्तम आरोग्यासाठी जगभरातील लोक प्रार्थना करत आहेत. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये हाजारो लोकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. व्हेटिकनच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्डिनल पिएत्रो पारोलिन यांनी या विशेष प्रार्थना सभेचे नेतृत्व केले. डॉक्टरांनी पूर्वी इशारा दिला होता की, पोप फ्रान्सिस यांना सेप्सिसचा धोका असण्याची शक्यता आहे. सेप्सिस ही रक्तसंक्रमणाची एक गंभीर अवस्था असते. मात्र, व्हेटिकने दिलेल्या माहितीनुसार, सेप्सिससंबंधी कोणतीही लक्षणे पोप फ्रान्सिस यांच्यात आढळली नाहीत. व्हेटिकन सांगितले की, हे सर्व लोकांच्या प्रार्थनांचे यश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ऑनलाइन स्कॅमच्या जाळ्यात अडकले पाकिस्तीनी युवक; नेमकं घडलं काय?