हजारो लोकांच्या प्रार्थनांना आले यश; पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती दम्याच्या अटॅकनंतर पुन्हा गंभीर झाली होती. यामुळे त्यांना उच्च प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागला, त्यांना रक्तही चढवण्यात आले. डॉक्टरांनी 21 फेब्रुवारी रोजी त्यांना धोक्याबाहेर असल्याचे सांगितले होते, मात्र नंतर त्यांच्या वेदना वाढल्या. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये झालेल्या गंभीर संसर्गामुळे त्यांची तब्येत खालावली होती. आता पुन्हा एकदा आणखी एक चांगली माहिती समोर आली आहे. पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या मूत्रपिंडाशी संबंधित समस्या नियंत्रणात आल्या असून त्यांना श्वसनासाठी फिजिओथेरपी दिली जात आहे.
पोप फ्रान्सिस यांची स्थिती
लोकांची प्रार्थना आणि समर्थन
पोप फ्रान्सिस यांच्या उत्तम आरोग्यासाठी जगभरातील लोक प्रार्थना करत आहेत. सेंट पीटर स्क्वेअरमध्ये हाजारो लोकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. व्हेटिकनच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्डिनल पिएत्रो पारोलिन यांनी या विशेष प्रार्थना सभेचे नेतृत्व केले. डॉक्टरांनी पूर्वी इशारा दिला होता की, पोप फ्रान्सिस यांना सेप्सिसचा धोका असण्याची शक्यता आहे. सेप्सिस ही रक्तसंक्रमणाची एक गंभीर अवस्था असते. मात्र, व्हेटिकने दिलेल्या माहितीनुसार, सेप्सिससंबंधी कोणतीही लक्षणे पोप फ्रान्सिस यांच्यात आढळली नाहीत. व्हेटिकन सांगितले की, हे सर्व लोकांच्या प्रार्थनांचे यश आहे.
सध्याची परिस्थिती
सध्या पोप फ्रान्सिस यांना आवश्यक उपचार दिले जात असून, त्यांची स्थिती सुधारत आहे. डॉक्टर त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर पूर्ण सुधारणा व्हावी यासाठी संपूर्ण जगातून प्रार्थना केल्या जात आहेत.