Pope fransis health update Francis has pneumonia but remains in 'good spirits,' Vatican says
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली असून काही दिवसांपूर्वी त्यांना रोमच्या पॉलिक्लिनिकमध्ये दाख करण्यात आले होते. दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. पोप फ्रान्सिस यांना दोन्ही फुफ्फुसांमध्ये न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे व्हॅटिकनने सांगितले आहे. 88 वर्षीय पोप गेल्या आठवड्यापासून श्वसन संसर्गाच्या आजारशी झुंजत होते आणि उपचारासाठी त्यांना शुक्रवारी रोमच्या जेमेली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दोन्ही फुफ्फुसांना न्यूमोनियाची लागण
“पोप फ्रान्सिस यांची डॉक्टरांनी काल दुपारी फॉलो-अप घेत छातीचे सीटी स्कॅन केले. या दरम्यान डॉक्टरांना दोन्ही फुफ्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे दिसून आले आणि त्यासाठी अतिरिक्त औषधोपचाराची आवश्यकता भासली,” अशी माहिती व्हॅटिकनने दिली आहे. व्हॅटिकनच्या दिलेल्या माहितीनुसार, लॅब चाचण्या, छातीचा एक्स-रे आणि पोप फ्रान्सिस यांची एकूण वैद्यकीय स्थिती “अद्याप गंभीर” आहे.
पोप फ्रान्सिस यांचे मनोबल बळकट
मात्र, यानंतरही, पोप फ्रान्सिसचे मनोबल अगदी बळकट असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी दिवसभर वाचन, विश्रांती आणि प्रार्थना केली असल्याचे व्हॅटिकन सांगितले. तसेच त्यांनी शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले व त्यांच्या प्रार्थना मागितल्या. गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी, पोप फ्रान्सिस यांना काही दिवसांपासून ब्रॉन्कायटीसची लक्षणे जाणवत होती. यामुळे त्यांनी आपले भाषण अधिकाऱ्यांमार्फत देण्याचे ठरवले.
पोप फ्रान्सिस यांचे कार्यक्रम रद्द
पोप फ्रान्सिस यांना 205 च्या कॅथोलि पवित्र वर्षासाठी अनेक कार्यक्रमांचे नेतृत्व करायचे होते, मात्र, सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याने काही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. व्हॅटिकन पुढील अपडेट लकवरच कळवण्यात येतील असे म्हटले आहे.
पोप फ्रान्सिस यांना तरुणपणी प्लुरिसी आजार होता
सोमवारी व्हॅटिकनने जाही केले की, पोप यांच्या रुग्णालयातील उपचारांदरम्यान दुसऱ्यांदा त्यांच्या औषधांमध्ये बदल करण्यात आला असून सुरुवातीला त्यांना “श्वसन संसर्गाचा आजार झाल्याचे” सांगण्यात आले होते. पोप फ्रान्सिस हे फुफ्फुसांच्या संक्रमणासाठी खूप संवेदनशील आहेत, कारण तरुणपणी त्यांना प्लुरिसी हा आजार झाला होता.
यामुळे त्यांचे एक फुफ्फुस काढावे लागले होते. तेव्हापासून त्यांना श्वसनाचा त्रासाचा धोका अधिक राहिला आहे. सध्याच्या परिस्थितीत पोप फ्रान्सिस यांच्या आरोग्यासाठी जगभरातून प्रार्थना आणि शुभेच्छांचा ओघ सुरू असून, त्यांच्या लवकर बरे होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.