President Donald Trump signs executive order for truck drivers, worries Sikhs in the US
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत असतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यापासून अनेक निर्णयांनी खळबळ उडवली आहे. त्यांनी शपथ घेताच एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यांच्या निर्णयांना केवळ जगभरातूनच नव्हे तर अमेरिकेतून देखील विरोध केला जात आहे. दरम्यान ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक नवा आदेश जारी केला आहे. यामुळे शीख समुदायाच्या ट्रक चालकांनी याचा निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ट्रक चालकांना इंग्रजी अनिवार्य केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रक चालकांना इंग्रजी भाषेत बोलणे अनिवार्य करणार्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांच्या या आदेशामुळे सीख समुदायाच्या ट्रक चालकांवर परिणाम होऊ शकतो, त्यांच्या रोजगारात अडथळे निर्माण होऊ शकतात.
अमेरिकेच्या ट्रक ड्रायव्हर्ससाठी रस्त्याचे समान्य नियम या कार्यकारी आदेशार ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. या कार्यकारी आदेशात म्हटले आहे की, अमेरिकेचे ट्रक ड्रायव्हर्स देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि अमेरिकन लोकांच्या उपजीवेकेसाठी आवश्यक आहेत.
यामुळे व्यावसायिक चालकांसाठी इंग्रीज भाषा येणे महत्वाचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असले पाहिजे. यामध्ये वाहन टालकांना सिग्रन वाचता आणि समजता आले पाहिजेत, तसेच वाहतूक सुरक्षा, सीमा गस्त कृषी चौक्या आणि माल वजन-मर्यादा स्टेशनवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधता आला पाहिजे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्रजीला अमेरिकेची अधिकृत राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केले आहे. दरम्यान आता यामुळे ट्रक चालकांना देखील इंग्रजी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. याच वेळी शीख कोॲलिशन संघटनेने यावर चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने म्हटले आहे की, “आम्हाला माहित आहे की, हा आदेश वाहतूक मंत्री शॉन डॅफी यांना इंग्रजी बोलण्याच्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी, तसेच तपासणी प्रक्रिया मजबूत करण्यासाठी लागू करण्यात आला आहे. परंतु या आदेशाचा शीख ट्रक चालकांवर परिणा होऊ शकतो. पात्र शीख व्यक्तींना रोजगार मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
अमेरिकेच्या या कार्यकारी आदेशामुळे ट्रकिंग उद्योगात मजबूत उपस्थिती असलेल्या शीख समुदायासाठी ही गंभीर चिंतेची बाबा आहे. अमेरिकेत सध्या ट्रक ऑपरेटिंह उद्योगात सुमारे 1 लाख 50 हजार शीख काम करतात. यातीव 90% शीख ट्रक चालक आहेत.