भारतीय विद्यार्थीनीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; समुद्रकिनारी आढळला मृतदेह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ओटावा: कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुक सोमवारी (28 एप्रिल) पार पडल्या. याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (59 एप्रिल) निवडणुकीचा निकाल जाहीरही करण्यात आला. या निवडणुकीमध्ये बिलबरल पक्षाचे मार्क कार्नी यांचा विजय झाला. याच दरम्यान भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा कॅनडातून भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. कॅनडातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय भारतीय विद्यार्थीनाचा मृत्यू झाला आहे.
ओटवाच्या कॉलेजजवळील समुद्रकिनाऱ्यावर तिचा मृतदेह आढळून आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वंशिका पंजाबमधील डेरा बस्सीच्या आपच्या नेत्याची देवंदेर सिंग यांची मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंशिका 25 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या शोध घेण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली. दरम्यान मंगळवारी (29 एप्रिल) ओटाव येथील समुद्रकिनाऱ्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला.
वंशिकाचे शालेय शिक्षण अडीच वर्षापूर्वी पूर्ण झाले होते. नंतर ती कॅनडाला पुढील शिक्षणासाठी गेली होती. कॅनडाच्या ओटावा येथील कॉलेजमध्ये ती डिप्लोमाचे शिक्षण घेत होती.
We are deeply saddened to be informed of the death of Ms. Vanshika, student from India in Ottawa. The matter has been taken up with concerned authorities and the cause is under investigation as per local police. We are in close contact with the bereaved kin and local community… https://t.co/7f4v8uGtuk
— India in Canada (@HCI_Ottawa) April 28, 2025
कॅनडातील भारतीय दूतावासाकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय दूतावासाने निवेदन जारी केले असून या निवेदनात म्हटले आहे की, “ओटावा येथे भारतीय विद्यार्थीनी सुश्री वंशिका यांच्या मृत्यू माहिती मिळाली. आम्हाला खूप दु:ख झाले आहे. हा विषय़ संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्यात आला आहे. तसेच स्थानिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वंशिकाच्या कुटुंबीयांना आमच्याकडून सर्वातोपरी मदत पुरवली जाईल.” सध्या या प्रकरणानंतर पंजाबसह संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण पसरलेले आहे.
ओटावातील हिंदू समुदायने जारी केलेल्या आवाहान म्हटले आहे की, वंशिका 25 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. रात्री 8-9च्या सुमारासकी भाड्याने रुम शोधण्यासाठी गेली होती. त्यानंतर रात्री 11:40 वाजता तिचा फोन बंद झाला. दुसऱ्या दिवशी तिची एक महत्वाची परिक्षा होती. परंतु ती परिक्षेलाही आली नाही. तिच्या कुटुंब आणि मित्रांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तिच्या ठावठिकाणाबद्दल कोणतीही माहिती सापडली नाही.