
protest against Sikh rally in New Zealand
दरम्यान याच वेळी न्यूझीलंडचे पाद्री पास्टर ब्रायन तामाकी यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, न्यूझीलंडाला न्यूझीलंडच राहू द्या. ही आमची भूमी आहे येथे फक्त खरे देशभक्त उभे राहिले आहेत. हा हिंसाचार नाही, तर आमची मुले फक्त स्पष्ट संदेश देत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी या हाका नृत्याला न्यूझीलंडच्या राजकारण्यांकडूनच विरोध होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तामाकी आणि त्यांच्या अनुयायांवर टीका करण्यात आली आहे. तसेच देशातील शीख समुदायाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. अनेकांनी त्यांनी म्हटले की, कोणत्या व्यक्तीने कोणत्या धर्माचा, अनुयायाचा विचार करायचा, कोणती जीवनशैली स्वीकारायची हे कोणी दुसरे ठरवू शकत नाही. यामुळे अशा प्रकारचे वर्तन आक्षेपहार्य आहे. अनेक खासदारांनी टीका केली आहे. हाकाचा वापर लोकांविरोधात वंशावद आणि कट्टर पसरवण्यासाठी करणे हे चुकीचे आहे. हा आपला मार्ग नाही असे मारा डेव्हिडसन खासदारांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान भारतात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केंद्र सरकारला या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने हा मुद्दा न्यूझीलंड सरकारसमोर करावा. प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे असे सुखबीर सिंग यांनी म्हटले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे विनंती करत भारतीय लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजनांचे आवाहन केले आहे.
काय आहे हाका नृत्य?
मिळालेल्या माहितीनुसार, हाका हा माओरी समाजाचा पारंपारिक नृत्यप्रकार आहे. हा नृत्यप्रकार विरोध, एकता आणि सन्मान दर्शवतो. हा एक गटाद्वारे सादर केला जातो. या नृत्यात पाय जोरात आपटणे आणि एका लयबद्ध आवाजात ओरडणे असते. यापूर्वी न्यूझीलंडच्या संसदेत हे नृत्य करण्यात आले होते.
Strongly condemn the disruption of the peaceful ‘Nagar Kirtan’ procession in South Auckland, New Zealand, yesterday by local protesters. Nagar Kirtan is a sacred Sikh tradition—a joyous religious parade involving the singing of hymns from Sri Guru Granth Sahib Ji, promoting… pic.twitter.com/DnCwX0XO5b — Sukhbir Singh Badal (@officeofssbadal) December 21, 2025
पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल