पाकिस्तानमध्ये झाली मुनीरची पोलखोल; ऑपरेशन सिंदूरवर टीका करताचा मौलानांनी सुनावले खडेबोल
भारतासाठी धोक्याची घंटा! सीमेजवळ पाकिस्तानच्या लष्करी हालचाली; युद्धाच्या तयारीत मुनीर?
मौलाना फझलुर यांनी असीम मुनीर यांना आरसा दाखवत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने केलेल्या ऑरपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची हार झाली आहे असे म्हटले. काही दिवसांपूर्वीच मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला दैवी शक्ती मिळाल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर मौलाना यांनी खडेबोल सुनावले. त्यांनी मुनीर यांना इतिहासाची आठवण करुन देत म्हटले की, एका हिंदू समोर ९० हजार सैनिकांनी झुकावे लागले होते.
तसेच पाकिस्तानचे लष्कर जनतेसमोर खोटे दिखावे उभे करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भारताचे ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत, या मोहिमेत पाकिस्ताने मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले. परंतु पाकिस्तानचे लष्कर जनतेला खोटी माहिती देत, त्यांना मूर्ख बनवत असल्याचे त्यांनी म्हटले. पहलगाम (Pahlgam Attack) येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने याचा बदला घेतला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्व्सत केले होते. यामुळे पाकिस्तान लष्कर बॅकफूटवर गेले होते. यानंतर पाकिस्तानी सैन्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पोलखोल झाली होती.
सध्या लष्करावर देशांतर्गत विरोधांकडून कडाडून टीका केली जात आहे. या टीकांना प्रत्युत्तर देताना मुनीर यांची बोलती बंदी झाली आहे. मौलाना यांनी मुनीरवर टीका करत पाकिस्तानात दहशतवादी लपल्याचे सांगितले. तसेच पाकिस्तानच्या इराण आणि अफगाणिस्तानवरील हल्ले योग्य असतील, तर भारताचे ऑपरेशन सिंदूर चुकीचे कसे ठरु शकते असाही प्रश्न त्यांनी केली आहे. त्यांनी पाकिस्तानतील आर्थिक परिस्थितीसाठी देखील लष्कराला जबाबदार धरले आहे. लष्कराच्या सरकारमध्ये हस्तक्षेपामुळे पाकिस्तानवर गरिबीची वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
मुनीरची दुतोंडीची भाषा; दहशतवादावर भाष्य करत ओकले भारताविरोधी विष






