
Su 57 fighter jet deal India Russia PD 8 engine Innoprom India Bharat Mandapam
जागतिक भू-राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin In India) भारत दौऱ्यावर येत आहेत. दिल्लीतील या दौऱ्यादरम्यान भारत आणि रशियादरम्यान अनेक अब्ज डॉलरच्या संरक्षण आणि तांत्रिक करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रशिया भारतासाठी नव्या पिढीची शक्तिशाली जेट इंजिने आणि अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान घेऊन येत आहे. याशिवाय, ५ व्या पिढीतील प्रसिद्ध ‘Su-57’ स्टेल्थ लढाऊ विमानांचे तंत्रज्ञान भारताला हस्तांतरित करण्यावरही दोन्ही देशांचे प्रमुख चर्चा करणार आहेत.
दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपम येथे ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान ‘इनोप्रोम इंडिया’ (Innoprom India) या आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात रशियाची सरकारी संरक्षण कंपनी ‘रोस्टेक’ (Rostec) आणि तिची उपकंपनी ‘युनायटेड इंजिन कॉर्पोरेशन’ आपले नव्याने विकसित केलेले ‘PD-8’ जेट इंजिन जगासमोर सादर करत आहे. हे अत्याधुनिक इंजिन रशियाच्या SJ-100 आणि Be-200 या नागरी प्रवासी विमानांना शक्ती देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. १.७ टन कोरडे वजन आणि टेकऑफच्या वेळी तब्बल ८ टन थ्रस्ट निर्माण करण्याची प्रचंड क्षमता या इंजिनमध्ये आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamic NATO: हुथी बंडखोरांचा सौदीवर मोठा हल्ला; 73 जखमी, 4 लाख बॅरल तेल निर्यात ठप्प; पाकिस्तानचे युद्धात उतरण्याचे संकेत
भारतातील संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (HAL) आणि रशियाच्या ‘युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ (UAC) यांच्यात झालेल्या करारांतर्गत ‘SJ-100’ हे प्रादेशिक प्रवासी विमान आता पूर्णपणे भारतात तयार केले जाणार आहे. या विमानात PD-8 इंजिनचा वापर केला जाईल. SJ-100 विमानाची आसनक्षमता ७५ ते १०३ प्रवाशांची असून, ते एकाच उड्डाणात ३,५३० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. ताशी १०१२ किलोमीटरच्या प्रचंड वेगाने (मॅक ०.८२) उड्डाण करण्याची क्षमता या विमानात आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकल्पाचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी हे एक क्रांतिकारक पाऊल ठरेल. केंद्र सरकारच्या ‘उडान’ (UDAN) योजनेअंतर्गत छोट्या शहरांना जोडणाऱ्या प्रादेशिक विमान वाहतुकीसाठी SJ-100 हे विमान एक ‘गेम-चेंजर’ सिद्ध होईल. देशातच प्रवासी विमानांची निर्मिती झाल्यामुळे खाजगी क्षेत्राला मोठे बळ मिळेल आणि हजारो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. रशियन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुढील ३ वर्षांच्या आत भारतातील पहिल्या सुपरजेट विमानाची निर्मिती प्रत्यक्ष सुरू होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-Iran War : होर्मुझच्या सामुद्रधुनीत थरार; जॉर्डनवर 20 क्षेपणास्त्रांचा मारा करून इराणकडून अमेरिकेचा पाणबुडी ड्रोन जप्त
या दौऱ्यातील सर्वात मोठा आणि लक्षवेधी मुद्दा म्हणजे ५ व्या पिढीचे ‘Su-57’ (Sukhoi-57) हे स्टेल्थ लढाऊ विमान. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली मानले जाणारे Su-57 विमान भारताला विकणे आणि त्यासोबत पूर्ण तंत्रज्ञान हस्तांतरित (Technology Transfer) करणे हा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अजेंड्यावरील प्रमुख विषय आहे.
भारतीय हवाई दलाच्या (IAF) आधुनिकतेसाठी ५ व्या पिढीच्या फायटर जेटची आवश्यकता भासत आहे. रशियाने भारतासोबत १०० ते २०० विमानांच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू केली आहे. जर हा करार अंतिम टप्प्यात पोहोचला, तर भारतीय हवाई दलाची ताकद आशिया खंडात अजोड होईल आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठे यश मिळेल.