Real reason behind Israel-Syria war that killed 300 explained briefly
Syria‑Israel border : सिरिया आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष जगभर चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या संघर्षामागे जे कारण उघड होत आहे, ते अनेकांना धक्का देणारे आहे. एका भाजी विक्रेत्याच्या चोरीच्या आणि मारहाणीच्या घटनेमुळे उडालेला वाद इतका पेटला की त्यातून सुरुवात झाली एका भयावह युद्धाला, ज्यात आतापर्यंत सुमारे ३०० लोकांना जीव गमवावा लागला आहे.
सिरियातील सुवैदा शहरात काही दिवसांपूर्वी भाजी विक्रेता फदल्लाह दवारा हे आपल्या कारने जात असताना चोरट्यांच्या एका टोळीने त्यांना अडवले. फदल्लाह यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, या चोरांनी त्यांच्याकडून ४०० पौंड म्हणजेच जवळपास ४५ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावले आणि त्यांना मारहाणही केली. ही घटना मीडियामध्ये समोर येताच, स्थानिकांमध्ये संतापाचा भडका उडाला.
या घटनेचा परिणाम इतका गंभीर झाला की, सुवैदामध्ये ड्रुझ आणि बेदौइन समुदायांमध्ये थेट संघर्ष सुरू झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. स्थानिक तणाव बघता, सिरियन सरकारने सुवैदा प्रांतात सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हिंसाचार रोखता येईल. पण यावर इस्रायलने वेगळीच प्रतिक्रिया दिली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी
सुवैदा शहर हे इस्रायलच्या सीमेपासून फारसं लांब नाही. त्यामुळे इस्रायलने सीरियन सैन्याची हालचाल सीमावर्ती भागात झाली असं मानून थेट हल्ला चढवला. इस्रायली सैन्य IDF ने सीरियन सैन्याला लक्ष्य केलं आणि पुढे जाऊन दमास्कसवरही हवाई हल्ले केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं की, “ड्रुझ समुदायाला कोणतीही हानी पोहोचू दिली जाणार नाही.” इस्रायलमध्ये देखील ड्रुझ समुदाय मोठ्या संख्येने असून, सीरियामधील त्यांच्या बांधवांच्या रक्षणासाठी इस्रायलने आपला पाठिंबा दिला आहे.
ड्रुझ हे एक विशिष्ट धार्मिक समुदाय आहे, जे पारंपरिक इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवत नाही. त्यांच्या श्रद्धा शिया इस्लामशी काही प्रमाणात जुळतात, पण त्यांचा स्वतंत्र धार्मिक मार्ग आहे. सध्या अंदाजे ७ लाख ड्रुझ समुदायाचे लोक दक्षिण सीरियात राहतात आणि त्यांच्यापैकी काही इस्रायलमध्येही आहेत. इस्रायलला या सीमावर्ती भागात ड्रुझचा पाठिंबा मिळवून आपली सुरक्षितता सुनिश्चित करायची आहे, म्हणूनच ते त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत.
जरी युद्धाचे मूळ कारण एक भाजी विक्रेत्याशी संबंधित असले, तरी परिस्थिती आता फारच बिकट झाली आहे. जर वेळेत दोन्ही देशांनी संयम बाळगला नाही, तर हे युद्ध हजारो निरपराध लोकांच्या जीवावर उठू शकते. ‘द टेलिग्राफ यूके’च्या अहवालानुसार, ही घटना आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि सीमावर्ती धोरणांमध्ये मोठा बदल घडवू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Emoji Day : हार्ट पाठवलं आणि थेट तुरुंगात? ‘या’ देशांनी इमोजींवर लावली बंदी, काय आहे कारण?
ही घटना आपल्याला दाखवते की, एक छोटीशी चूक किंवा स्थानिक वाद किती मोठ्या आगीचा भडका बनू शकतो. राजकारण, धर्म, आणि आंतरराष्ट्रीय निती यामध्ये मानवी भावनांचा विस्फोट केव्हा होईल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणूनच, संयम, संवाद आणि सहकार्य या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत अत्यंत आवश्यक ठरतात.