• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Emoji Day 2025 This Emoji Is Banned In Some Countries And Can Lead To Jail

World Emoji Day : हार्ट पाठवलं आणि थेट तुरुंगात? ‘या’ देशांनी इमोजींवर लावली बंदी, काय आहे कारण?

World Emoji Day 2025 : 17 जुलै ही तारीख जागतिक इमोजी दिनाला समर्पित आहे. भावना व्यक्त करणारे इमोजी. ही तरुणांची नवीन भाषा बनली आहे, परंतु तीच इमोजी काही देशांना त्रासदायक देखील आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 17, 2025 | 09:30 AM
World Emoji Day 2025 This emoji is banned in some countries and can lead to jail

World Emoji Day : हार्ट पाठवलं आणि थेट तुरुंगात? 'या' देशांनी इमोजींवर लावली बंदी, काय आहे कारण? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Emoji Day 2025 : आजच्या डिजिटल युगात जर कोणी भाषा नव्याने जन्माला घातली असेल, तर ती म्हणजे ‘इमोजी’ची भाषा. शब्द न वापरता भावना, विचार, राग, प्रेम, मजा, दु:ख अगदी काहीही व्यक्त करण्याचा हा नवा मार्ग आजच्या पिढीला विशेष भावतो. त्यामुळेच दरवर्षी १७ जुलै रोजी ‘वर्ल्ड इमोजी डे’ साजरा केला जातो. पण हे इमोजी सर्वांनाच आवडतात असे नाही! जगात असेही काही देश आहेत जिथे इमोजी पाठवणं म्हणजे कायद्याचा भंग मानला जातो. काही ठिकाणी तर ‘हार्ट इमोजी’ पाठवल्यास थेट तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते!

इमोजीचा जन्म कुठे आणि कसा झाला?

१९९९ साली जपानमध्ये ‘शिगेताका कुरिता’ या युवकाने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी इमोजी तयार केले. त्यावेळी मोबाईलवरील मेसेजिंग मर्यादित शब्दांत होती आणि भावना व्यक्त करणं कठीण जात होतं. हे लक्षात घेत त्यांनी १७६ इमोजींचा पहिला संच तयार केला, ज्याचा उपयोग लोकांनी भरभरून केला. आज हे इमोजी न्यू यॉर्कमधील Museum of Modern Art मध्ये संग्रहित आहेत.

जगभरातील लोकप्रियता आणि नियंत्रण कोणाकडे?

इंटरनेट क्रांतीनंतर इमोजीचा वापर झपाट्याने वाढला. २०१३ मध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीने ‘इमोजी’ हा शब्द आपल्या शब्दकोशात समाविष्ट केला. २०१५ मध्ये तो ‘वर्षाचा शब्द’ म्हणून घोषित झाला. यानंतर युनिकोड कन्सोर्टियम ही ना-नफा संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था कोणते नवीन इमोजी यावेत, त्यांचे डिझाईन कसे असावे, याचा निर्णय घेते. गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्या या संस्थेच्या सदस्य आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 8 वर्षांची तपश्चर्या! रशियाची ‘ती’ रहस्यमय साध्वी, गोकर्ण जंगलात गुहा, गुहेत रुद्र मूर्ती; वाचा ‘ही’ गूढ रंजक कहाणी

😂  आनंदाच्या अश्रूंनी हसणारा चेहरा” – जगातला सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी

आज सोशल मीडियावर दररोज सुमारे १० अब्ज इमोजी पाठवले जातात. त्यातील 😂 (Face with tears of joy) हा इमोजी गेल्या अनेक वर्षांपासून सर्वोच्च स्थानी आहे. इमोजी प्लॅटफॉर्मवर थोडाफार वेगळा दिसतो, पण भावना व्यक्त करण्यात तो नेहमीच प्रभावी ठरतो.

कोणत्या देशांनी इमोजींवर बंदी घातली आहे?

जागतिकीकरणामुळे जिथे इमोजी एक ‘युनिव्हर्सल भाषा’ बनत आहेत, तिथे काही देशांनी मात्र त्यांच्या वापरावर निर्बंध घातले आहेत:

  • सौदी अरेबिया : LGBTQ+ संबंधित 🌈, 👬, 👭 इमोजींवर बंदी आहे. इतकंच नव्हे, एखाद्याला ❤️ हार्ट इमोजी पाठवल्यास ३ ते ५ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. याला “अनैतिक संबंधांना प्रोत्साहन” मानले जाते.

  • इराण : येथे प्रेम, चुंबन, नृत्य, पाश्चात्य संस्कृतीशी संबंधित इमोजी तसेच LGBTQ+ इमोजींवर बंदी आहे. देशातील इस्लामी मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोप करून हे निर्णय घेण्यात आले आहेत.

  • रशिया : येथे LGBTQ+ संदर्भातील कोणतीही इमोजी, स्टिकर्स, किंवा पोस्ट्स यांच्यावर बंदी आहे. सोशल मीडियावर देखील याचे काटेकोर निरीक्षण केले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्रह्मांड अफाट आहे! पृथ्वीभोवती फिरत आहेत ‘लपलेले चंद्र’? संशोधनातून उघड झाले मिनीमूनचे अद्भुत रहस्य

विचार करायला लावणारा प्रश्न…

जिथे एक इमोजी आपल्यातल्या भावना एका क्षणात दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, तिथे त्यावर शिक्षा, बंदी ही गोष्ट काहींना विचित्र वाटू शकते. परंतु प्रत्येक देशाच्या सांस्कृतिक, धार्मिक, आणि राजकीय मर्यादा वेगळ्या असतात. त्यामुळेच आजच्या ‘वर्ल्ड इमोजी डे’च्या निमित्ताने आपण या नव्या भाषेचे मोल जाणून घेतले पाहिजे, आणि वापरताना आपला सोशल मीडिया वापर जबाबदारीने केला पाहिजे.

Web Title: World emoji day 2025 this emoji is banned in some countries and can lead to jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • special story

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय

Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय

Nov 01, 2025 | 05:27 PM
Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर

Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर

Nov 01, 2025 | 05:27 PM
Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Nov 01, 2025 | 05:18 PM
“अलविदा… पण शेवट..’ रोहन बोपण्णाकडून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; भावुक पोस्ट करत २० वर्षांच्या कारकिर्दीचा घेतला निरोप 

“अलविदा… पण शेवट..’ रोहन बोपण्णाकडून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; भावुक पोस्ट करत २० वर्षांच्या कारकिर्दीचा घेतला निरोप 

Nov 01, 2025 | 05:16 PM
Powai Hostage Case:”मी स्टुडिओत पोहोचलो अन्..” रोहित आर्यासंदर्भात गिरीश ओक यांनी केला धक्कादायक खुलासा

Powai Hostage Case:”मी स्टुडिओत पोहोचलो अन्..” रोहित आर्यासंदर्भात गिरीश ओक यांनी केला धक्कादायक खुलासा

Nov 01, 2025 | 05:11 PM
MCA निवडणुकीत ‘कूलिंग-ऑफ’ नियमांवरून वाद; पदाधिकाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन करून पुन्हा लढण्याचा आरोप!

MCA निवडणुकीत ‘कूलिंग-ऑफ’ नियमांवरून वाद; पदाधिकाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन करून पुन्हा लढण्याचा आरोप!

Nov 01, 2025 | 05:08 PM
Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार

Nanded News: 15 नोव्हेंबर 2025 पासून नांदेडमध्ये ‘या’ 2 बहुप्रतिक्षित विमानसेवा सुरु होणार

Nov 01, 2025 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM
MUMBAI : MVA-MNS चा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, सोलापूरहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

MUMBAI : MVA-MNS चा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, सोलापूरहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

Nov 01, 2025 | 01:39 PM
Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Oct 31, 2025 | 08:13 PM
Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Oct 31, 2025 | 08:07 PM
Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Oct 31, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Oct 31, 2025 | 07:41 PM
पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

Oct 31, 2025 | 07:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.