फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: भारतीय विद्यार्थ्यांची बऱ्याच काळापासून यूके अभ्यासासाठी पहिली पसंती आहे. युकेमधील विद्यापीठात अभ्यासासाठीचे अनुकूल वातावरण आहे. जगभरातून लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी युकेला येतात. आपले धेय्य साध्य करण्यासाठी तसेच या देशाची चैतन्यशील संस्कृती अनुभवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी येतात. 2023 मध्ये जगभरातून 679970 पेक्षा जास्त विद्यार्थी यूकेमध्ये अभ्यासासाठी आले होते. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता यूकेने आता आपल्या व्हिसा नियमांमध्ये बदल केले आहेत.
कुटूंबासोबत राहता येणार नाही
यूकेने आपल्या व्हिसा नियमांमध्ये सुधारणा केल्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांसाठी काही अडथळे निर्माण झाले आहेत, ज्याचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवरही होणार आहे. या नव्या नियमांनुसार, पूर्वी पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना सोबत आणण्याची मुभा होती, मात्र आता ही सुविधा फक्त संशोधन करणाऱ्या (पीएचडी) विद्यार्थ्यांसाठी मर्यादित केली आहे. अन्य विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. याशिवाययूकेमध्ये राहण्याच्या खर्चातही वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमांमध्ये आर्थिक बदल करण्यात आले आहेत. मासिक देखभाल रकमेत वाढ करण्यात आली आहे. लंडनमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दरमहा £1483 (सुमारे 1.64 लाख रुपये) तर लंडनबाहेरील विद्यार्थ्यांना £1136 (सुमारे 1.25 लाख रुपये) भरावे लागतील. हा दर 2025 पासून लागू होईल.
व्हिसा कालावधीत बदल
मिळालेल्या माहितीनुसार महत्त्वाचे म्हणजे, यूकेकडून विद्यार्थ्यांच्या व्हिसा कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत. आता विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय पदवीधर व्हिसासाठी अर्ज करता येणार नाही. पूर्वीच्या नियमानुसार, शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षे यूकेमध्ये राहून काम करता येत होते. परंतु आता हा लाभ आता केवळ संशोधन करणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.
Important Reminder: Do not travel to the UK without your Student visa or before the issue date of your Student permission. It’s essential to have your Student visa approved in your passport or issued electronically before you travel to the UK. pic.twitter.com/qjgTultS9k
— UK Visas & Immigration Official (@UKVIgovuk) September 18, 2024
नवीन नियम लागू होण्यापूर्वी यूकेमध्ये राहणाऱ्यांना हा नियम लागू होईल. ज्यांना यूकेमध्ये राहायचे आहे ते वर्क व्हिसा बदलण्याचा पर्याय शोधू शकतात. विद्यार्थी कुशल कामगार निकषांची पूर्तता करत असल्यास अभ्यास करण्याऐवजी रोजगाराच्या आधारावर यूकेमध्ये राहणे निवडू शकतात. तथापि, प्रत्येकाला तसे करण्याची परवानगी नाही. पोस्ट स्टडी वर्क (PSW) च्या अटी पूर्ण करणारेच हे करू शकतात. याचा अर्थ ज्या कुटुंबांचे विद्यार्थी शिक्षणानंतर कामावर गेले त्यांना यूकेमध्ये राहण्याची संधी मिळेल. जानेवारी 2024 नंतर कामावर जाणाऱ्यांना हा लाभ मिळणार नाही.