Renowned US University Harvard Accused of Antisemitism Federal Funding at Risk
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या नामांकित विद्यापीठ हार्वर्ड युनिनव्हर्सिटीवर ट्रम्प प्रशासनाने यहूदीविरोधी विचारांना पाठिंबा दिल्याचा मोठा आरोप केला आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने कोलंबिया युनिव्हर्सिटीवर आरोप केला होता आणि विद्यापीठाला मिळणाऱ्या सरकारकी निधीत कपात केली होती. यामुळे आता हार्वर्ड युनिव्हर्सिटीला मिळाणाऱ्या सरकारी निधीतही कपात होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला देखील धक्का बसू शकतो.
दरम्यान हार्वर्डसारख्या नामांकित विद्यापीठांना ट्रम्प प्रशासनाने इशारा दिला आहे. प्रशासनाच्या मते, हार्वर्ड मध्ये 7 ऑक्टोबर 2023 मध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या अनेक महाविद्यालयांमध्ये इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ निदर्शने काढण्यात आली होती. अनेक ठिकाणी गॅस द ज्यूज अशी घोषणा देण्यात आली होती. यामुळे यहूदी विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण झाली होती. दरम्यान ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड युनिव्हर्सिटीवरही यहूदींविरोधी विचारांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
सध्या युनिव्हर्सिटीकडे 53 अब्ज डॉलर्सचा सरकार निधी आहे. हा निधी अमेरिकेतील सर्वात श्रीमंत विद्यापीठांना देण्यात येतो. मात्र, सरकारने 9 अब्ज डॉलर्सच्या सरकारी निधीची कपात केल्यावर युनिव्हर्सिटीच्या प्रतिष्ठेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या संघीय टास्क फोर्ड कोलंबिया आणि हार्वर्ड विद्यापीठाची चौकशी करत आहे. यहूदीविरोधी कायद्यांमध्ये विद्यापीठाचा सहभाग असल्यास मोठे नुकसान होण्यची शक्यता आहे.
एंटीसेमिटिझम म्हणजे यहूदीद्वेष. ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली तेव्हापासून एंटी-सेमिटिमला सुरुवात झाली. यहुदी स्वत:ला पहिले कॅथलिक मानत होते. मध्ये युगात युरोपमध्ये यहूदीनागरिकांबद्दल अफवा पसरवण्यात आल्या. ख्रिश्चन मुलांचे अपहरण करुन त्यांचा बळी घेण्यात आला. हिटरलेने या द्वेषातून होलोकॉस्टमध्ये लाखो यहुद्यांवर अन्याय केला. यामुळे मोठ्या प्रमाणात द्वेष वाढू लागला.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच दरवर्षी 600 ते 1200 यहूदीविरोधी गुन्हे घडतातय अमेरिकेतील ज्यू समुदायावर हिंसक हल्ल्यांची संख्या दरवर्षी वाढत गेली. यामुळे हार्वर्ड आणि इतर अनेक नामांकित विद्यापीठांमद्ये असा घटनांना टालना दिली जात असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हार्वर्ड, कोलंबियासारखे मोठे विद्यापीठ अशा घटनांवर नियंत्रण ठेवत नाही, यामुळे या विद्यापीठांना मिळणाऱ्या सरकारी निधीत कपात करण्यात येईल. सध्या फेडरल टास्क फोर्स हार्वर्ड आणि काही नामांकित विद्यापीठांची चौकशी करत आहे. यामुळे हार्वर्डच्या धोऱमांवर तसेच अमेरिकेच्या शिक्षण संस्थांच्या स्वायत्ततेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.