
reza pahlavi return to iran 2026 protests inflation trump warning khamenei regime crisis
Reza Pahlavi return to Iran 2026 : जगाच्या राजकारणात सध्या इराण (Iran) पुन्हा एकदा ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर ज्या राजेशाहीचा अंत झाला होता, तीच राजेशाही आता पुन्हा एकदा इराणच्या जनतेसाठी ‘शेवटची आशा’ म्हणून समोर येत आहे. इराणचे निर्वासित क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांनी दिलेल्या एका सोशल मीडिया संदेशानंतर इराणमधील चित्र पूर्णपणे बदलले आहे. महागाई, बेरोजगारी आणि मानवाधिकारांच्या पायमल्लीने त्रस्त झालेली जनता आता थेट अयातुल्ला अली खमेनी यांच्या सत्तेला आव्हान देत आहे.
गुरुवारी, ८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता (स्थानिक वेळ) रझा पहलवी यांनी इराणी जनतेला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तेहरानच्या ग्रँड बाजारपासून ते मशहद आणि इस्फहानपर्यंत लाखो लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांच्या हातात शाह राजवटीचे झेंडे असून “हाच शेवटचा लढा आहे, पहलवी नक्कीच परत येतील” अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला आहे. प्रत्युत्तरात, इराण सरकारने संपूर्ण देशात इंटरनेट ब्लॅकआऊट केला आहे, जेणेकरून आंदोलकांचा संवाद तुटावा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Greenland : जागतिक महायुद्धाचा सायरन! ग्रीनलँडवर चीन आणि रशियाच्या कब्जाची Trumpला भीती; उघडले 500 अब्ज डॉलर्सचे पाकीट
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या परिस्थितीवर कडक भाष्य केले आहे. व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांना ज्या प्रकारे सत्तेवरून खेचून अटक करण्यात आली, तसाच काहीसा प्रकार इराणमध्येही होऊ शकतो, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, “जर इराण सरकारने शांततापूर्ण आंदोलकांवर गोळीबार केला, तर अमेरिका गप्प बसणार नाही.” ट्रम्प यांनी रझा पहलवी यांना ‘एक चांगला माणूस’ म्हटले असले तरी, त्यांना थेट सत्तेवर बसवण्याबाबत अजून अधिकृत भूमिका घेतलेली नाही.
Reza Pahlavi just URGED Trump to ‘Be prepared to intervene to help the people of Iran’ as blackout hits 24+ hours, death toll 60+, crowds chant ‘Death to Khamenei’ despite bullets. The regime is in full blown panic mode and scared. While libs ignore REAL oppression, Trump’s… pic.twitter.com/lGl84JAwLu — The Elephant in the Room (@elephant_23) January 9, 2026
credit : social media and Twitter
५० वर्षांनंतर इराणला परतणे हे रझा पहलवी यांच्यासाठी सोपे नाही. जरी त्यांना ८५% लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात असला, तरी वास्तव काही वेगळे असू शकते. तज्ज्ञांच्या मते, इराणमधील इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) हा जगातील सर्वात शक्तिशाली निमलष्करी गट आजही खमेनी यांच्या पाठीशी उभा आहे. जर पहलवी परतले, तर त्यांना ‘देशद्रोही’ ठरवून फाशीची शिक्षा देण्याची धमकी इराणच्या न्यायव्यवस्थेने दिली आहे. शिवाय, इराणमधील तरुण पिढीला लोकशाही हवी आहे की राजेशाही, हा देखील एक मोठा यक्षप्रश्न आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर
इराणमधील या उद्रेकाचे मुख्य कारण म्हणजे ‘भूक’. इराणचे चलन ‘रियाल’ हे डॉलरच्या तुलनेत १.४ दशलक्ष (१४ लाख) पर्यंत घसरले आहे. महागाईचा दर ६० टक्क्यांच्या पुढे गेला असून अन्नासाठी रांगा लागल्या आहेत. अशातच, ट्रम्प प्रशासनाने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर पुन्हा निर्बंध लादल्याने इराणची आर्थिक कोंडी झाली आहे. जनतेला आता वाटते की, शाह यांच्या राजवटीत इराण जसा ‘मिडल इस्टचे पॅरिस’ होता, तशीच सुबत्ता पुन्हा यावी.
Ans: १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमधील राजेशाही संपली. तेव्हा १७ वर्षांचे असलेले रझा पहलवी अमेरिकेला शिक्षणासाठी गेले होते आणि तेव्हापासून ते निर्वासित म्हणून तिथेच राहत आहेत.
Ans: वाढती महागाई (६०% हून अधिक), चलनाचे अवमूल्यन, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि अयातुल्ला राजवटीचा भ्रष्टाचार ही आंदोलनाची मुख्य कारणे आहेत.
Ans: ट्रम्प इराणच्या विद्यमान राजवटीचे कट्टर विरोधक आहेत. त्यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला असून गरज पडल्यास लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे, मात्र रझा पहलवींना अधिकृत मान्यता देण्याबाबत ते सावध आहेत.