ट्रम्पच्या दादागिरीला brics चे चोख प्रतिउत्तर; युद्धसराव करून करून अमेरिकेला दाखवली ताकद, भारत मात्र गैरहजर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
BRICS naval exercise South Africa 2026 : जगातील वाढत्या भू-राजकीय तणावादरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या सायमन टाउन नौदल तळावर चीन, रशिया आणि इराणच्या युद्धनौकांचा जत्था दाखल झाला आहे. ‘ब्रिक्स प्लस’ (BRICS+) देशांचा हा आठवडाभर चालणारा ‘विल फॉर पीस २०२६’ हा नौदल सराव शुक्रवारपासून सुरू झाला आहे. मात्र, या सरावामध्ये ब्रिक्सचा महत्त्वाचा स्तंभ असलेला भारत अनुपस्थित असल्याने जागतिक राजनैतिक वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या नौदल सरावाचे नेतृत्व चीन करत असून दक्षिण आफ्रिका याचे यजमानपद भूषवत आहे. चिनी नौदलाने आपले १६१ मीटर लांबीचे विनाशक ‘तांगशान’ (Tangshan) तैनात केले आहे. रशियाने ७,००० टन वजनाचे ‘मार्शल शापोश्निकोव्ह’ हे क्षेपणास्त्र सज्ज जहाज पाठवले आहे, तर २०२४ मध्ये ब्रिक्समध्ये सामील झालेला इराण आपल्या दोन अत्याधुनिक फ्रीगेट्ससह सहभागी झाला आहे. हा सराव अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून तिथले तेल टँकर जप्त करण्याची मोहीम राबवली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: ‘आम्ही इशारा दिला होता!’ रशियाने युक्रेनवर डागलं ताशी 13,000 किमी वेगाचं क्षेपणास्त्र; युरोप युद्धाच्या छायेत
ब्रिक्सचा एक संस्थापक सदस्य म्हणून भारताला या सरावासाठी औपचारिक निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भारताने यात सहभागी न होण्याचा ‘धोरणात्मक निर्णय’ घेतला आहे. यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे: १. चीनसोबतचा सीमावाद: पूर्व लडाखमधील गलवान संघर्षानंतर भारताने चीनसोबतचे लष्करी सहकार्य मर्यादित केले आहे. जोपर्यंत सीमेवर पूर्वस्थिती (Status Quo) येत नाही, तोपर्यंत चीनच्या नेतृत्वाखालील कोणत्याही लष्करी सरावात सहभागी न होण्याचे भारताचे धोरण आहे. २. अमेरिकेसोबतचे संतुलन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सध्या अमेरिकेसोबतच्या संरक्षणात्मक संबंधांना प्राधान्य देत आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्सला ‘अमेरिका विरोधी’ गट म्हणून संबोधल्यामुळे, अशा सरावात सहभागी होऊन अमेरिकेला नाराज करणे भारताला परवडणारे नाही.
Chinese naval ships have arrived in False Bay near Cape Town, South Africa 🇿🇦, ahead of China -led naval exercises in South African waters 🇿🇦 involving BRICS countries. Russian warships have docked in Walvis Bay, Namibia 🇳🇦, and are heading to South Africa 🇿🇦 for the same… pic.twitter.com/6vVG8grCBF — Africa View Facts (@AfricaViewFacts) January 7, 2026
credit : social media and Twitter
दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षण दलाने (SANDF) सांगितले की, या सरावाचा उद्देश सागरी सुरक्षा आणि चाचेगिरीविरोधी मोहिमांमध्ये सहकार्य वाढवणे हा आहे. परंतु, राजकीय विश्लेषकांच्या मते, हा सराव अमेरिकेच्या ‘एकध्रुवीय’ वर्चस्वाला दिलेले आव्हान आहे. रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असताना आणि इराणवर अमेरिकेचे निर्बंध असताना, या देशांचे एकत्र येणे म्हणजे अमेरिकेला एक प्रकारचा इशाराच आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Protests: तेहरानमध्ये रक्ताचा पूर! 200 मृत्यूंनंतर खामेनेईंचे ‘शूट-ॲट-साईट’चे आदेश; इराणमध्ये पेटली क्रांतीची मशाल
दक्षिण आफ्रिकेच्या या निर्णयामुळे त्यांच्यावर अंतर्गत दबावही वाढत आहे. देशातील विरोधी पक्ष ‘डेमोक्रॅटिक अलायन्स’ने (DA) सरकारवर टीका केली असून, रशिया आणि इराणसारख्या देशांना पाठिंबा देऊन दक्षिण आफ्रिका आपली तटस्थता गमावत असल्याचे म्हटले आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेने आपला सागरी व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रिक्स देशांचे सहकार्य आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
Ans: हा चीन, रशिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स प्लस देशांचा संयुक्त नौदल सराव आहे, जो सागरी सुरक्षा आणि व्यापार मार्गांच्या संरक्षणासाठी आयोजित केला जातो.
Ans: चीनसोबतचा प्रलंबित सीमावाद आणि अमेरिकेसोबतचे महत्त्वाचे धोरणात्मक संबंध लक्षात घेता, भारताने या सरावापासून दूर राहण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.
Ans: रशिया आणि इराणसारख्या निर्बंधाखालील देशांना दक्षिण आफ्रिकेने व्यासपीठ दिल्यामुळे अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतील राजनैतिक संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता आहे.






