
Syria Violence
सुप्रीम अलवाइट इस्लामिक कौन्सिलचे प्रमुख अलवाइट शेख गझल यांनी या निदर्शनांचे आजोयन केले होते. सीरियातील लाझिका, टार्टस आणि इतर अनेक ठिकाणी ही निदर्शने झाली. यामध्ये अंतरिम सरकारविरोधी तीव्र निषेध नोंदवला गेला. अलवाइट समुदायावर गेल्या काही महिन्यांत हिंसाचार वाढत चालला असून याविरोधा आवाजा उठवण्यासाठी अलवाइट समुदायाचे लोक एकत्र जमले होते.
सीरियाच्या लाझिका येथील निदर्शनांदरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला. यावेळी निदर्शकांनी सुरक्षा दलांच्या गाड्यांना आग लावली, टार्टस परिसराती एका पोलिस स्टेशनवर बॉम्ब फेकले. यामध्ये दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. शिवाय याला विरोध म्हणून सरकारच्या समर्थकांनी अलवाइट समुदायावार दगडफेक केली. निदर्शकांना हटवण्यासाठी सुरक्षा दलांकडून गोळीबारही करण्यात आला.
शुक्रवारी(२६ डिसेंबर) अलावाइट समुदायाच्या मशिदीत झालेल्या हल्ल्याची जबाबदारी सराया अन्सार अल-सुन्ना या अल्प-ज्ञात कट्टरपंथी गटाने स्वीकारली आहे. त्यांनी अलावाइट समुदायाच्या सदस्यांना लक्ष्य केले होते.
सीरियामध्ये डिसेंबर २०२४ मध्ये बशर-अल-असदची सत्ता उलथवून टाकण्यात आली होती. हयात-तहरीर-अल-श्याम (HTS)या गटाने सीरियाची राजधानी दमास्कस ताब्यात घेत बशर सत्तेवर हल्ला बोल केला होता. या हल्ल्यानंतर बशर-अल-असदने सीरियातून पळ काढला आणि HTS गटाची सत्ता स्थापन झाली. या गटाचे नेतृत्त्व अल-जुलानी यांच्याकडे आहे. या सत्तापालटानंतर अद्यापही सीरियामध्ये अस्थिरता कायम आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.