Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Army Aids Case: रशियन सैन्यात झपाट्याने वाढतोय HIV Aids चा संसर्ग; अहवालांतून धक्कादायक कारणे उघड

काही रशियन सैनिकांनी खुलासा केला आहे की एचआयव्ही संसर्ग असूनही त्यांना युद्धात उतरण्यासाठी अँटी-व्हायरल औषधे दिली जातात. ही औषधे रोग बरा करत नाहीत, परंतु विषाणूचा प्रभाव कमी करतात

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 01, 2025 | 11:41 AM
Russia Army Aids Case: रशियन सैन्यात झपाट्याने वाढतोय HIV Aids चा संसर्ग; अहवालांतून धक्कादायक कारणे उघड
Follow Us
Close
Follow Us:

Russia Army Aids Case: जगात सर्वाधिक एचआयव्ही संसर्ग असलेल्या देशांमध्ये रशियाचा समावेश आहे. आता युक्रेन युद्धामुळे ही परिस्थिती आणखी भयानक झाली आहे. अहवालांनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैनिकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण २० ते ४० पट वाढले आहे.

रशियात एचआयव्हीचा संसर्ग वाढण्याची अनेक संभाव्य कारणेही समोर आली आहेत. यातील सर्वात पहिले म्हणजे, युद्धाची तणावपूर्ण परिस्थिती. रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो रशियन सैनिक सध्या तणावाखाली जगत आहेत. युद्धामुळे आज आहोत तर उद्या नाही, अशी या सैनिकांची मनस्थिती झाली आहे. याच तणावातून ते असुरक्षित लैंगिक संबंध आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधिन होऊ लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही सैनिक अंमली पदार्थांच्या वापरासाठी एकाच सिरींजचा वापर करत असल्याचे अहवालातून उघड झाले आहे. ज्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढला आहे.

4 वर्षांनी म्यानमारमधील आणीबाणी उठवली, U Nyo Saw यांना नवीन संघराज्य सरकारची जबाबदारी; लवकरच निवडणुका जाहीर

युद्धक्षेत्रात आरोग्य साधनांचा अभाव आणि निष्काळजीपणा
युक्रेन सीमेवर असलेल्या रशियन लष्करी तळांमध्ये आरोग्य सेवांची तीव्र कमतरता आहे. कंडोमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव, कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय फील्ड हॉस्पिटलमध्ये संक्रमित सैनिकांवर उपचार आणि नसबंदीचा अभाव यामुळे एचआयव्ही संसर्ग वेगाने पसरू लागला आहे.

एका वृत्त वाहिनीच्या अहवालानुसार, अनेक संक्रमित सैनिकांना आपत्कालीन परिस्थितीत उपचारांसाठी दाखल केले जाते, परंतु वेळ आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे तेथे खबरदारी घेतली जात नाही. यामुळे संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. या युद्धामुळे रशियात आरोग्यसेवेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Trump Tariff: भारतासह सर्व देशांवरील ट्रम्प टॅरीफची ‘इडापिडा’ टळली? Pakistan वर मोठे उपकार

तुरुंगातून एचआयव्ही बाधित कैद्यांची थेट सैन्यात भरती

याशिवाय अहवालांमध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. रशिया थेट तुरुंगांमधून सैनिकांची भरती करत आहे, ज्यामध्ये अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह कैदी देखील आहेत. सैन्यबळ वाढवण्यासाठी रशियन सरकारकडून हे पाऊल उचलले गेले असले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या मते, रशियन सैन्यात भरती होणाऱ्या नवीन सैनिकांपैकी किमान २०% एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. त्याचा प्रभाव केवळ लष्करी क्षेत्रापुरता मर्यादित नसून त्याचा संपूर्ण आरोग्यसेवा व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. युद्धकाळातील रणनीती आणि मानवी हक्कांमधील हा एक नवीन संघर्ष असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जीवनरक्षक अँटी-व्हायरल औषधे आणि त्यांच्या मर्यादा

काही रशियन सैनिकांनी खुलासा केला आहे की एचआयव्ही संसर्ग असूनही त्यांना युद्धात उतरण्यासाठी अँटी-व्हायरल औषधे दिली जातात. ही औषधे रोग बरा करत नाहीत, परंतु विषाणूचा प्रभाव कमी करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे इतर आजारांची लागण होण्याची शक्यता कमी होते. पण तरीही, युद्धक्षेत्रात या औषधांचा पुरवठा सातत्याने होत राहणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. मर्यादित संसाधने आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे हे प्रयत्न अपूर्ण असल्याचेही रशियन सैनिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Russia army aids case hiv aids infection is increasing rapidly in the russian army reports reveal shocking reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • international news
  • Russia Ukraine War
  • Russian President Putin

संबंधित बातम्या

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता
1

Pakistan IMF Loan: कंगाल पाकिस्तानला मिळणार ‘लाइफलाईन’; IMF कडून ७ अब्ज डॉलरचे कर्ज मिळण्याची शक्यता

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल
2

Afghanistan Internet Ban: अफगाणिस्तानचा जगाशी संपर्क तुटला! तालिबानने देशभरात इंटरनेट केले बंद; नागरिकांचे हाल

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित
3

Bishnoi Gang as Terrorist: कॅनडा सरकारचा मोठा निर्णय! लॉरेन्स बिश्नोई टोळीला ‘दहशतवादी गट’ म्हणून घोषित

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
4

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.