Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तैवान हा चीनचा भाग असल्याचे रशियाला मान्य, पुतिन-जिनपिंग मिटिंगमध्ये दिले समर्थन, बदल्यात नाटोच्या विस्तारविरोधी धोरणाला चीनचा पाठिंबा

रशिया ‘वन चायना’ या सिद्धांताचे समर्थन करते. या बदल्यात चीननेही युक्रेन प्रश्नी, अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावात रशियाचे समर्थन केले आहे. जगातील दोन महाशक्ती अशा स्थितीत एकत्र आल्याने, तैवान आणि युक्रेन संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 04, 2022 | 08:40 PM
तैवान हा चीनचा भाग असल्याचे रशियाला मान्य, पुतिन-जिनपिंग मिटिंगमध्ये दिले समर्थन, बदल्यात नाटोच्या विस्तारविरोधी धोरणाला चीनचा पाठिंबा
Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) हे शुक्रवारी अचानक बिजिंगमध्ये (Beijing) दाखल झाले. बिजिंगमध्ये पुतीन यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Chinese President Xi Jinping) यांची भेट घेतली. या भेटीत तैवान हा चीनचा अविभाज्य घटक असल्याचे रशियाने मान्य केले आहे. तैवानला (Taiwan) कुठल्याही प्रकारची स्वतंत्रता देण्यासही पुतिन यांनी विरोध दर्शविला आहे.

या भेटीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, रशिया ‘वन चायना’ या सिद्धांताचे समर्थन करते. या बदल्यात चीननेही युक्रेन प्रश्नी, अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावात रशियाचे समर्थन केले आहे. जगातील दोन महाशक्ती अशा स्थितीत एकत्र आल्याने, तैवान आणि युक्रेन संकट अधिक गहिरे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संयुक्त निवेदनावर अमेरिका लक्ष्य

५३०० शब्दांच्या या संयुक्त निवेदनात, चीन आणि रशिया या दोन्ही देशांनी एक दुसऱ्याच्या हिताचे संरक्षण करण्य़ासाठी सहयोग करण्याचे ठरविले आहे. यात दोन्ही देशांचे सार्वभौमत्व, अखंडता आणि देशांतर्गत प्रकरणात इतर कुठल्याही देशाने हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान चीनने अमेरिकेवर आरोप केला आहे की, अमेरिका हाँगकाँगमध्ये दंगली घडवत आहे. त्याचबरोबर तैवानच्या स्वतंत्रतेसाठी अमेरिका प्रयत्न असल्याचा आरोपही चीनने केला आहे. रशियानेही अमेरिका युक्रेन संकट वाढतवत असल्याचा आरोप केला आहे.

[read_also content=”शिवसेनेशी युती करावी किंवा नाही यावर मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद! पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर केला आहे त्यांचा निर्णय अंतिम असेल : मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-congress-disagrees-on-whether-to-form-alliance-with-shiv-sena-or-not-bhai-jagtap-nrvb-232737.html”]

रणनीतीनुसार दोन वर्षांनी झाली पुतिन-जिनपिंग भेट

युक्रेनचा नाटो देशात समावेश करु नये, यासाठी पुतिन सध्या अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांसमोर उभे ठाकले आहेत. पश्चिमेतील देश हा प्रश्न सोडवण्यासाठी साजकीय मुत्सद्देगिरीने प्रयत्न करीत आहेत. याच काळात पुतीन आणि जिनपिंग यांची भेट हा एका रणनीतीचाच भाग मानण्यात येतो आहे.

शीतयुद्धाच्या दिशेने नाटो देशांनी जाऊ नये

गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदा जिनपिंग यांनी एखाद्या राष्ट्राध्यक्षाची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. या भेटीमुळे या दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होणार, यात शंका नाही. नाटो देशांनी शीतयुद्ध काळातील रणनीती वापरु नये, असे आवाहन दोन्ही देशांकडून करण्यात आले आहे.

[read_also content=”फेसबुकचे शेअर्स गडगडले : झुक्याभाऊ लय वाईट झालं; फेसबुकला एका दिवसात 200 अब्ज डॉलरचे नुकसान, भारतावर फोडलं खापर https://www.navarashtra.com/business/mark-zuckerberg-meta-shares-crash-more-than-26-percent-biggest-single-day-wipeout-in-history-nrvb-232560.html”]

चीन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीचा मोठा गाजावाजा चीनमध्ये करण्यात आला. यात अमेरिकेला डिवचण्याचा चीनचा आणि रशियाचाही प्रयत्न आहे. चीनने अमेरिका आणि नाटो देशांच्याविरोओधात रशियाने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करीत असल्याचे, जिनपिंग यांनी जाहीरपणे सांगितले आहे. युक्रेनवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी संयुक्त राष्ट्रसंघात रशियाची साथ देणार असल्याचे चीनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

यात चीनचाही स्वताचा मोठा डाव असल्याचे मानण्यात येते आहे. प्रतिस्पर्धी म्हणून अमेरिका चीनकडे पाहते आहे. या भेटीमुळे तो फोकस बदलून रशियावर जाईल अशीही चीनला आशा आहे. युक्रेनच्या प्रकरणात रशियाला एकाकी करण्याचा अमेरिकाचा प्रयत्न या भएटीने अयशस्वी झाला आहे. तर या भेटीमुळे चीन-अमेरिका या युद्धात बदल होण्याची शक्यता आहे. याचे परिणाम युरोपच्याऐवजी आशिया खंडात आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Russia backs natos anti expansion policy in exchange for support given to russia at putin jinping meeting nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2022 | 08:40 PM

Topics:  

  • China
  • Russia
  • चीन
  • रशिया

संबंधित बातम्या

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?
1

युद्धभूमीवर ड्रॅगनचा नवा धमाका! मैदानात उतरवले  ‘हे’ घातक शस्त्र, जाणून घ्या किती शक्तीशाली?

World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ
2

World War 3: तिसऱ्या महायुद्धाचा काउंटडाउन! अमेरिकेपासून भारतापर्यंत 10 देश युद्धाच्या उंबरठ्यावर; जनताजनार्दन सोसणार झळ

War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर
3

War Alert: आता तिसरे महायुद्ध अटळ? पुतिन यांचा ‘Oreshnik’ प्रहार; पोलंड सीमेवर स्फोट, युक्रेन तर फक्त निमित्त पण NATO निशाण्यावर

War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर
4

War Alert: Trumpच्या दादागिरीला BRICSचा आक्रमक कूटनीतिक संदेश; हिंदी महासागरात Russia-Chinaच्या युद्धनौका तैनात, India गैरहजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.