Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Su-57E technology:रशिया म्हणतो की ते अशा काही भागीदारांपैकी एक आहे जे तंत्रज्ञान रोखून किंवा त्यावर अवलंबित्व निर्माण करून भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला मर्यादित करत नाहीत, तर ते आणखी मजबूत करण्याचा मार्ग मोकळा करतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 19, 2025 | 11:43 AM
Russia offers Su-57 stealth fighter to India 100% technology transfer guaranteed

Russia offers Su-57 stealth fighter to India 100% technology transfer guaranteed

Follow Us
Close
Follow Us:
  • रशियाने भारताला एसयू-५७ पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान देण्याची अधिकृत ऑफर दिली आहे.
  • रशिया कोणत्याही अटीशिवाय १००% तंत्रज्ञान हस्तांतरण व भारतात उत्पादन सुविधा उभा करण्यास तयार आहे.
  • पुतिन यांच्या भारत भेटीपूर्वी हा प्रस्ताव येत असून, भारतीय हवाई दलाच्या फ्लीटमध्ये पाचव्या पिढीतील जेट जोडण्याच्या योजनांना गती मिळाली आहे.

Su-57E technology transfer : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन( vladimir putin) पुढील महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या भेटीआधीच मॉस्कोकडून दिलेला एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव भारत-रशिया ( India-Russia) संरक्षणसहकार्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. अनेक दशकांच्या सामरिक नात्याची पुनर्स्थापना करत, रशियाने भारताला त्यांचे अत्याधुनिक एसयू-५७ (Su-57) पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट देऊ केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रशिया या जेटचे १००% तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतातच परवानाधारक उत्पादन सुरू करण्यास पूर्णपणे तयार आहे.

भारताला दिलेली सर्वात मोठी ‘टेक्नॉलॉजी ऑफर’

दुबई एअर शोदरम्यान रशियाच्या सरकारी मालकीच्या रोसोबोरोनेक्सपोर्ट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अधिकृतपणे घोषणा केली की,
“आम्ही भारताला Su-57 पुरवण्यास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारतात उत्पादन क्षमता उभारण्यास पूर्णतः तयार आहोत.”

या पॅकेजमध्ये समाविष्ट असणार,

  • पाचव्या पिढीतील स्टेल्थ तंत्रज्ञान
  • अत्याधुनिक इंजिन प्रणाली
  • फायटर जेटच्या अन्य महत्त्वपूर्ण प्रणालींवरील संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण
  • कोणतेही निर्बंध किंवा अटी नसलेले टेक ट्रान्सफर

ही घोषणा अशा काळात करण्यात आली आहे जेव्हा भारतीय हवाई दल पुढील पिढीतील फायटर जेट्सचा पर्याय शोधत आहे. पश्चिमी देशांनी (अमेरिका, युरोप) भारताला फायटर जेटच्या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण देण्यास फारशी तयारी दाखवलेली नाही. अशावेळी रशियाची १००% टेक्नॉलॉजी ऑफर भारतासाठी एक मोठी संधी मानली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

भारत-रशिया संरक्षणसंबंधांचा ऐतिहासिक प्रवास

भारत आणि रशिया (पूर्वीचे USSR) यांचे संरक्षण क्षेत्रातील नाते जवळपास ६ दशकांहून अधिक जुने आहे. 1960 च्या दशकात MiG-21 चे भारतातील उत्पादन हा या मैत्रीचा पाया ठरला.
नंतरचे काळात,

  • MiG-23
  • MiG-27
  • Su-30MKI
  • ब्रह्मोस यांसारखे अनेक महत्वाचे प्रकल्प या सहकार्याचा भाग झाले.

आजही भारतीय हवाई दलाच्या फ्लीटमध्ये Su-30MKI हे मुख्य आणि सर्वात विश्वासार्ह लढाऊ विमान आहे.

भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला पाठबळ

वियन च्या अहवालानुसार, रशियाने नमूद केले आहे की,

“आम्ही काही मोजक्या देशांपैकी एक आहोत जे भारताला तंत्रज्ञान रोखून ठेवत नाहीत. उलट, आम्ही भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला अधिक दृढ करण्याचा मार्ग तयार करतो.”

पश्चिमी देशांकडून येणाऱ्या मर्यादित तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अटींमुळे भारताला आपल्या संरक्षण प्रकल्पांमध्ये स्वायत्तता साधणे कठीण होते. याच्या उलट, रशियाचा दावा आहे की, कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसलेले तंत्रज्ञान हस्तांतरण हे त्यांचे भारताशी असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

Su-57 भारतासाठी का महत्त्वाचा?

Su-57 हा जगातील अत्यंत प्रगत पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट्सपैकी एक आहे. त्याची वैशिष्ट्ये,

  • रडारला जवळपास अदृश्य
  • अतिवेगवान सुपरक्रूझ क्षमता
  • प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली
  • उच्च पेलोड क्षमता
  • अत्याधुनिक AI-आधारित फायर कंट्रोल

भारतीय हवाई दलासाठी भविष्यातील युद्धतंत्रात असे स्टेल्थ फायटर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

पुतिन यांच्या भेटीपूर्वी वाढली हलचल

रशियन राष्ट्राध्यक्ष येण्याआधीच संरक्षणक्षेत्रात दोन्ही देशांमधील चर्चेला वेग आला आहे. कयास बांधले जात आहेत की, पुतिन यांच्या भेटीदरम्यान Su-57 कराराविषयी महत्त्वाची प्रगती होऊ शकते. भारतीय हवाई दलाच्या भविष्यातील ताफ्यात ‘पाचव्या पिढीचे जेट’ समाविष्ट करण्याचा निर्णय या भेटीनंतर अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Su-57 काय आहे आणि ते भारतासाठी का महत्त्वाचे आहे?

    Ans: Su-57 हे रशियाचे पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान असून भारताच्या भविष्यातील हवाई क्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

  • Que: रशिया भारताला किती तंत्रज्ञान हस्तांतरण देऊ करत आहे?

    Ans: रशिया कोणत्याही अटीशिवाय १००% तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतात उत्पादनाची सुविधा देण्यास तयार आहे.

  • Que: Su-57 बाबत करार केव्हा होऊ शकतो?

    Ans: पुतिन यांच्या आगामी भारत भेटीदरम्यान या प्रस्तावावर महत्त्वाची प्रगती होण्याची शक्यता आहे.

Web Title: Russia offers su 57 stealth fighter to india 100 technology transfer guaranteed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • India Russia relations
  • International Political news
  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
1

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
2

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता
3

US-Saudi deal: व्हाईट हाऊसमध्ये ऐतिहासिक करार; ट्रम्प यांनी क्राउन प्रिन्सची ‘दूरगामी’ रणनीती, F-35 च्या विक्रीला मान्यता

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…
4

PM Kisan Nidhi Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21 वा हफ्ता आज केला जाणार वितरीत; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.