भारताच्या हवाई ताकदीत होणार वाढ! रशियाने दिली Su-57 पाचव्या पिढीतील लढाऊ विमानाची ऑफर; जाणून घ्या धोकादायक फायटर जेटची ताकद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
रशियच्या सरकारी वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने भारताला पाचव्या पिढीतील Su-57च्या स्टेल्थ विमानाची ऑफर पुन्हा एकदा दिली आहे. रशियाच्या मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशन सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, भारताकडे रशियाची S-400 ही संरक्षण प्रणाली आहे. या प्रणालीच्या मदतीने ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या संरक्षणात मोठी मदत झाली होती. आज आपण रशियाच्या या ताकदवार लढाऊ विमानाची क्षमता जाणून घेणार आहोत.
हमासच्या दहशतवाद्यांचा क्रूर चेहरा; भररस्त्यात केली तीन नागरिकांची निर्दयी हत्या, Video Viral
रशियाने भारताला कोणती ऑफर दिली आहे?
रशियाने भारतासमोर Su-57 पाचवी आवृत्ती Su-57E च्या खरेदीची आणि त्याच्या उत्पादनाची ऑफर दिली आहे, ज्यामुळे भारताच्या लष्करी ताकदीत वाढ होईल.
भारताची रशियाच्या ऑफरवर काय प्रतिक्रिया आहे?
सध्या भारताने रशियाच्या या ऑफरवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.






