फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Russia Plague Lab Mystery: इतिहासच्या पानांमध्ये नोंदवलेली ‘ब्लॅक डेथ’ म्हणजेच प्लेग या रोगाचे नाव ऐकताच अंगावर काटा येतो. चौदाव्या शतकात या भयानक आजाराने जगातील एक तृतीयांश लोकसंख्येला कंठस्नान घातले होते. वैज्ञानिक प्रगतीच्या बळावर या आजारावर नियंत्रण मिळवण्यात आले आणि आज याला इतिहासाचा एक काळा अध्याय मानले जाते. परंतु, अलीकडेच रशियाच्या सायबेरिया प्रदेशातून आलेल्या एका बातमीने जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सायबेरियातील प्रमुख अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या डारया शिपिलोवा या महिला संशोधकाचा संशयास्पद आणि अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
जेव्हा प्लेगसारखा आजार जगभरातून जवळपास नाहीसा झाला आहे, तेव्हा रशियाच्या या गुप्त आणि अतिसंवेदनशील संस्थांमध्ये आजही यावर संशोधन का सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सायबेरिया त्याच्या अतोनात थंडी आणि दुर्गम भागांसाठी ओळखला जातो. हिवाळ्यात येथील तापमान ० ते उणे ५० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. अशा बर्फाच्छादित आणि एकाकी वातावरणात रशिया नेमके काय लपवत आहे? ही घटना केवळ एका संशोधकाचा मृत्यू नाही, तर निसर्ग आणि प्रयोगशाळांमधील खेळ किती धोकादायक ठरू शकतो, याची जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांसाठी ही एक चेतावणी आहे.
सायबेरियाचे नाव ऐकताच बर्फाची पांढरी चादर आणि हाडे गोठवणारी थंडी डोळ्यांसमोर येते. येथील तापमान बऱ्याचदा उणे (मायनस) मध्ये असते. रशियाने याच थंड आणि निर्मनुष्य भागात एक अत्यंत गुप्त आणि उच्च सुरक्षा असलेली संशोधन संस्था स्थापन केली आहे, जिथे जगातील सर्वात धोकादायक आणि जीवघेण्या आजारांवर संशोधन केले जाते. या संस्थेचे नाव ‘अँटी-प्लेग इन्स्टिट्यूट’ आहे. रशियाचा हा भाग इतका वेगळा आहे की, समजा येथील एखादा खतरनाक व्हायरस किंवा बॅक्टेरिया लीक झालाच, तरी तो त्वरित सामान्य लोकसंख्येला धक्का पोहोचू शकत नाही. सोव्हिएत युद्धाच्या काळापासूनच सायबेरियाला जैविक संशोधनाचे (बायोलॉजिकल रिसर्च) केंद्र मानले जात आले आहे.
प्लेग पसरवणारे बॅक्टेरिया काळानुरूप स्वतःमध्ये बदल करू शकतात, म्हणूनच आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने त्यावर मात केली असली तरी रशिया यावर संशोधन करत आहे. जैविक शस्त्रे स्पर्धा आणि भविष्यातील अज्ञात साथीच्या रोगांच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी रशिया आपली तयारी भक्कम ठेवू इच्छितो.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे सायबेरियातील साचलेला गोठलेला बर्फ वितळत आहे. या बर्फाखाली शतकानुशतके गाडलेले गेलेले जुने बॅक्टेरिया आणि व्हायरस पुन्हा जीवित होऊ शकतात, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. यामुळेच प्राचीन प्लेग किंवा एखादा नवीन म्यूटंट व्हायरस वातावरणात परत आल्यास मानवी शरीरावर त्याचा काय परिणाम होईल, हे समजून घेण्याचा प्रयत्न रूसी वैज्ञानिक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबेरियाच्या त्या प्रयोगशाळेत संशोधन सुरू होते, जी आता अपघाताची किंवा हलगर्जीपणाची शिकार ठरली आहे.






