फोटो सौजन्य सोशल मीडिया
एपेस्टीनला रशियामध्ये फक्त महिलांमध्येच रस न्हवता ,तर तेथील श्रीमंत आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींशी संबंध आणि मैत्री निर्माण करून स्वतःची प्रतिमा सुधारण्याचीही त्याची महत्वाकांक्षा होती . यामधील खास बाब म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट घेण्यासाठीही त्याने अनेकदा प्रयत्न केले होते . पण पुतीन आणि एपस्टीन यांच्या भेटीचे कोणतेही पुरावे अजून तरी समोर आले नाहीत .
या एपस्टीनच्या नादाला मोठ्या मोठ्या देशांचे लोक लागले असून संपूर्ण जगातील समाजकारण आणि राजकारण यामुळे बदलणार आहे . अशा चर्चा आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्लेषक करत आहेत . सध्या अमेरिकेत याबाबत कोर्टात केस सुरु असून ,हळूहळू यामागील उलगडा होताना दिसत आहे .
रशियातील महिलांशी एपस्टीनचे संबंध मॉडेलिंगच्या व्यवसायातून वाढले . सोव्हियेत संघाच्या विघटनानंतर पूर्व यूरोप मधील अनेक तरुणी आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रयत्नशील होत्या . याच संधीचा वापर एपस्टीनने केल्याचे तपासात समोर आले आहे . फ्रेंच मॉडेलिंग एजंट जीन ल्युक ब्रुनेल याच्याशी त्याचे जवळचे संबंध होते .
ब्रुनेलच्या माध्यमातून तरुणींना अमेरिका आणि युरोपमधील मॉडेलिंगच्या संधी देण्याचे अमिश दाखवले जात होते . तपासानंतर माजी सोव्हियेत संघातील किमान १७ महिला एपस्टीनच्या लैंगिक शोषण आणि तस्करीच्या जाळ्यात ओढल्या गेल्या होत्या . काही महिलांना नोकरी , व्हिसा आणि राहण्याची व्यवस्था देण्याच्या नावाखाली त्याच्यावर अवलंबून ठेवण्यात आले . त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे पिडीतांनी सांगितले आहे .
२००८ मध्ये अल्पवयीन मुलींशी संबंधित लैंगिग गुन्ह्यात दोषी ठरवल्यानंतर एपस्टीनची प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली होती . त्यानंतर त्याने रशियातील प्रभावशाली व्यावसायिकांशी संबंध वाढवण्यास सुरवात केली . रशियन अब्जाधीश व्लादिस्लाव डोरोनीन यांच्याशी त्याचे संबंध होते .
दोघांमध्ये मॉस्कोमधील कोट्यवधी डॉलर्सच्या रिअल इस्टेट प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचे ई -मेलमधून समोर आले . याशिवाय अॅल्युमिनियम उद्योगातील उद्योगपती ओलेग डेरीपास्का याच्याशी संपर्क साधण्याचाही एपस्टीनने प्रयत्न केला होता . मात्र त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही . रशियातील श्रीमंत उद्योगपतींच्या संपर्कातून आर्थिक संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवणे हा त्याच्या प्रयत्नाचा महत्वाचा भाग होता .
Indonesia News : यूट्यूबची १९ हजारांहून अधिक चॅनेल्स हटवली; गुगलला इंडोनेशिया सरकारचा जाब
एपस्टीनची सर्वात मोठी महत्वाकांक्षा म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची वैयक्तीक भेट घेणे . २०११ मध्ये त्याने पुतीन यांच्याशी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता . मात्र पुतीन यांची भेट झाल्याचे किंवा एपस्टीन रशियन गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे तपासात आढळलेले नाहीत . ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या तुरुंगात एपस्टीनचा मृत्यू झाला, अधिकृतरीत्या आत्महत्या घोषित करण्यात आले .






