Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Gold India: ट्रम्प यांचे निर्बंध हवेत विरले! रशियाने भारतासाठी उघडली सोन्याची खाण; तेलावरच्या ‘टॅरिफ वॉर’ला सडेतोड उत्तर

Russia Gold : युक्रेनमधील युद्धावरून अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियावर मोठे निर्बंध लादले आहेत. तरीही, पुतिन यांनी त्यांचा मित्र भारतासोबत व्यापार सुरू ठेवला आहे. त्यांनी तसे करण्याचा मार्गही शोधून काढला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 22, 2026 | 12:35 PM
russia selling gold to india bypass us oil sanctions trump tariff impact 2026

russia selling gold to india bypass us oil sanctions trump tariff impact 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • तेलाऐवजी सोन्याचा आधार
  • ट्रम्प यांचे धोरण अपयशी? 
  • विक्रमी निर्यात

Russia India gold trade 2026 update : युक्रेन युद्धाच्या धगधगत्या ज्वालांमध्ये रशियाला आर्थिक कोंडीत पकडण्याचे अमेरिकेचे सर्व प्रयत्न आता धुळीस मिळताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियन तेलावर ५०% इतके अवाढव्य शुल्क लावून भारतासारख्या मित्रदेशांना रशियापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी याला अत्यंत चतुराईने उत्तर दिले आहे. रशियाने आता भारताला तेलाऐवजी ‘सोन्याची’ (Gold) थेट विक्री सुरू केली असून, या ऐतिहासिक व्यवहाराने जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.

निर्बंधांना बगल देण्यासाठी सोन्याचा ‘मास्टरस्ट्रोक’

अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियाला आंतरराष्ट्रीय बँकिंग प्रणाली (SWIFT) आणि डॉलरमध्ये व्यवहार करणे कठीण झाले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल खरेदी करणाऱ्या भारतावर २५% अतिरिक्त ‘पेनल्टी टॅरिफ’ लादले, ज्यामुळे एकूण कर ५० टक्क्यांवर पोहोचला. यामुळे भारताने रशियन तेलाची खरेदी काही प्रमाणात कमी केली. मात्र, रशियाने तात्काळ सोन्याचे साठे भारताकडे वळवले. रशियन वृत्तसंस्था ‘आरआयए नोवोस्ती’च्या अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या पहिल्या १० महिन्यांत रशियाने भारतात ५० दशलक्ष डॉलर्सहून (अंदाजे ४५८ अब्ज रुपये) अधिक किमतीचे सोने निर्यात केले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Greenland Deal: डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा ‘यू-टर्न’! युरोपवरील टॅरिफ बॉम्ब निकामी; ग्रीनलँडसाठी नाटोसोबत झाला ऐतिहासिक करार

२०२१ नंतरची सर्वात मोठी खेप

भारताच्या वाणिज्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये रशियाकडून २३.४ दशलक्ष डॉलर्सचे सोने भारतात आले. २०२१ नंतरची ही सर्वात मोठी ‘डिलिव्हरी’ मानली जात आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा २६.९ दशलक्ष डॉलर्सचे सोने रशियातून भारतात पोहोचले. ट्रम्प प्रशासनाचा दावा होता की तेलावर निर्बंध लादल्यास पुतिन यांच्याकडे युद्धासाठी पैसा उरणार नाही, पण सोन्याच्या या व्यवहाराने रशियाची अर्थव्यवस्था अजूनही स्थिर असल्याचे सिद्ध केले आहे.

🚨 BIG BREAKING Russia’s gold EXPORTS to India hit a 5-year high. Over $50 MILLION worth of gold was shipped Jan–Oct, reports RIA Novosti citing India’s commerce data. India’s gold demand rose 16.5% to $50.7 BILLION in 2025. pic.twitter.com/9h9AZS84CM — Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) January 22, 2026

credit – social media and Twitter

रशियाचा नॅशनल वेल्थ फंड (NWF) आणि सोन्याची विक्री

रशियाच्या अर्थ मंत्रालयाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. १६ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रशिया दररोज १६५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे चिनी युआन आणि सोने विकणार आहे. हा आकडा कोविड-१९ च्या संकटात खर्च केलेल्या रकमेपेक्षाही जास्त आहे. गेल्या चार वर्षांत रशियाने आपल्या एकूण साठ्यापैकी ६०% सोन्याची विक्री केली आहे. हे पाऊल रशियन चलनाला (रुबल) स्थिर ठेवण्यासाठी आणि युक्रेनमधील लष्करी मोहिमेला वित्तपुरवठा करण्यासाठी उचलले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Budget Traditions: भारतात ‘हलवा’ समारंभ तर ‘या’ देशातील अर्थमंत्र्यांचा ‘बूट’ ठरवतो देशाचे भविष्य; वाचा ‘या’ रंजक परंपरेबद्दल

भारताची भूमिका: समतोल राखण्याचे आव्हान

एकिकडे अमेरिकेचा वाढता दबाव आणि दुसरीकडे रशियाची जुनी मैत्री, अशा कात्रीत भारत सापडला आहे. भारताने अमेरिकेच्या ५०% टॅरिफमुळे रशियन तेलाची आयात कमी करून सौदी अरेबिया आणि इराककडून तेल खरेदी वाढवली असली, तरी सोन्याच्या रूपाने रशियाशी व्यापार सुरू ठेवला आहे. भारतासाठी रशियाकडून मिळणारे सोने हे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रशिया भारताला सोने का विकत आहे?

    Ans: अमेरिकेने रशियन तेलावर ५०% आयात शुल्क लादल्यामुळे आणि डॉलरमधील व्यवहार रोखल्यामुळे, रशियाने भारतासोबत व्यापार सुरू ठेवण्यासाठी सोन्याचा वापर सुरू केला आहे.

  • Que: ट्रम्प प्रशासनाने भारतावर किती शुल्क लादले आहे?

    Ans: ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर एकूण ५०% (२५% अतिरिक्त + २५% रिसिप्रोकल) शुल्क लादले आहे.

  • Que: रशियाने किती सोन्याची विक्री केली आहे?

    Ans: अहवालानुसार, रशियाने गेल्या चार वर्षांत त्यांच्या एकूण साठ्यापैकी सुमारे ६०% सोन्याची विक्री केली असून, केवळ २०२५ च्या १० महिन्यांत भारतात ४५८ अब्ज रुपयांचे सोने निर्यात केले आहे.

Web Title: Russia selling gold to india bypass us oil sanctions trump tariff impact 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Donald Trump
  • international news
  • PM Narendra Modi
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Budget Traditions: भारतात ‘हलवा’ समारंभ तर ‘या’ देशातील अर्थमंत्र्यांचा ‘बूट’ ठरवतो देशाचे भविष्य; वाचा ‘या’ रंजक परंपरेबद्दल
1

Budget Traditions: भारतात ‘हलवा’ समारंभ तर ‘या’ देशातील अर्थमंत्र्यांचा ‘बूट’ ठरवतो देशाचे भविष्य; वाचा ‘या’ रंजक परंपरेबद्दल

‘हो, मी हुकूमशहा’! दावोसमध्ये ट्रम्प यांनी असं काय म्हटलं? ज्यामुळे जागतिक राजकारणात उठलं वादळ
2

‘हो, मी हुकूमशहा’! दावोसमध्ये ट्रम्प यांनी असं काय म्हटलं? ज्यामुळे जागतिक राजकारणात उठलं वादळ

हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार
3

हर्षवर्धन सपकाळ ‘या’ तारखेला वाराणसी दौऱ्यावर; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

‘आमच्यामुळे तुम्ही जिवंत आहात’ ; दावोसमध्ये ट्रम्प कडाडले; अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’वरुन कॅनडाला मोठा इशारा
4

‘आमच्यामुळे तुम्ही जिवंत आहात’ ; दावोसमध्ये ट्रम्प कडाडले; अमेरिकेच्या ‘गोल्डन डोम’वरुन कॅनडाला मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.