Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

US Midterm Elections : अमेरिकेत मतदान सुरु; ट्रम्प यांची वाढली धाकधूक

US Midterm Elections : अमेरिकेत मध्यावधी निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आहे. प्रतिनिधीगृह आणि सिनेटवरील वर्चस्वासाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक पक्षांमध्ये चुरस आहे. या निकालातून ट्रम्प यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कार्यकाळातील राजकीय ताकद आणि धोरणांना मिळणारे पाठबळ स्पष्ट होणार आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 03, 2026 | 06:05 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्यासाठी निवडणूक का महत्वाची
  • अमेरिकेतील संसदीय रचना
  • जगावर काय परिणाम
US Midterm Elections : अमेरिकेतील निवडणूक ही भारतातील निवडणुकीपेक्षा वेगळी असते . अमेरिकेत लोकशाही असली तरी तिथे फक्त दोनच पक्ष आहेत . एक रिपब्लिकन आणि दुसरा डेमोक्रॅट्स . भारतात सुद्धा लोकशाही आहे पण भारतात पक्ष संख्येवर मर्यादा नाहीत . अमेरिकेत पंतप्रधानांचे उमेदवार हे आधीच घोषित करून निवडणूक त्यांच्या नावावर लढवली जाते .

ते दोन उमेदवार एका खुल्या मंचावर येऊन एकमेकांसोबत जाहीरपणे वादविवाद करतात . तसेच अमेरिकेत एकदा पंचवार्षिक निवडणूक झाली कि पुढील पाच वर्ष किंवा चार वर्ष निवडणूक नसते असे नाही . अर्धी टर्म झाल्यावर पुन्हा मध्यावधी निवडणुका तिथे घेतल्या जातात . त्यामुळे प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला दोनदा निवडणुकीला सामोरे जावे लागते . या सारख्या अनेक बाबींमुळे अमेरिकेत लोकशाही जिवंत राहण्यासाठी कटिबद्ध होत राहत असते .

ट्रम्प यांच्यासाठी निवडणूक का महत्वाची

अमेरीकेत मध्यावधी निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे . डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दोन वर्षात काँग्रेसवर कोणाचे नियंत्रण असेल हे ठरवण्यासाठी लाखो नागरिक आज अमेरिकेत मतदान करत आहेत . ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या आणि जगाच्या राजकारणात उलथापालथ करायला सुरवात केली . त्यांनी घेतलेल्या निर्णयांनी बऱ्याचदा अमेरिकेला गोत्यात आणले आहे . अशा टीका त्यांच्यावर झाल्या आहेत . आता त्यांच्या अध्यक्षपदाची शेवटची दोन वर्ष राहिली आहेत .

ते यानंतर कधीही परत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकणार नाहीत . अमेरिकेत लोकांना जास्त चिंता महागाईची आहे . ट्रम्प यांनी लादलेले आक्रमक शुल्क आणि इराणसोबतचे युद्ध नागरिकांना आवडले नाही . यामुळे अन्न आणि इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत . यासर्वावर ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यात विक्रमी संख्येत ट्रम्प यांची लोकप्रियता घटली आहे .

त्यांनी देशभरात डझनभर सभा घेऊन जोरदार प्रचार मोहीम राबवली आहार . पण वाढत्या किमती ही सर्वच पक्षांच्या मतदारांसाठी चिंतेची बाब आहे .पण ट्रम्प यांच्यासाठी मात्र ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे . ही निवडणूक हरल्यास त्यांच्यावर बरीच बंधने येऊ शकतात तसेच वातावरण आणखी गडद झाल्यास त्यांना खुर्चीवरून पायउतार सुद्धा व्हावे लागेल . अशा चर्चा रंगलेल्या आहेत .

ज्याची भीती होती तेच झालं! इराणवर अमेरिकेचा पुन्हा हल्ला; केशम बेटावर गुप्त कारवाई, ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेने चिंता वाढली

अमेरिकेतील संसदीय रचना

अमेरिकेची संसद काँग्रेस ( US Congress ) म्हणून ओळखली जाते . अमेरिकेची संसदीय व्यवस्था दोन सदनीय असून तिचे दोन प्रमुख भाग आहेत . त्यातल्या पहिल्या भागाला प्रतिनिधीगृह असे म्हणतात . त्यामध्ये सदस्यांची एकूण सदस्य संख्या ४३५ एवढी असते . सदस्यांचा कार्यकाळ फक्त दोन वर्षांचा असतो . यामध्ये प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळतात .

या प्रतिनिधीगृहाची महत्वाची भूमिका अर्थसंकल्प आणि आर्थिक विधेयकांमध्ये असते . तर दुसऱ्या भागाला सिनेट ( Senate ) असे म्हणतात . त्याची एकूण सदस्य संख्या १०० असते . प्रत्येक राज्यातून दोन सिनेटर निवडले जातात . प्रत्येक सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो . दर दोन वर्षांनी साधारण एक तृतीयांश जागांसाठी निवडणूक होते . राष्ट्राध्यक्षांच्या महत्वाच्या नियुक्त्या आणि आंतराराष्ट्रीय करारांना मान्यता मान्यता देण्याचे अधिकार सिनेटकडे असतात .

Helicopter Accident: एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान मोठी दुर्घटना; नेपाळमधील हेलिकॉप्टर अपघातात भारतीय नागरिक दगावला!

जगावर काय परिणाम

एका अर्थाने ट्रम्प यांचे जाणे हे अमेरिकेसाठी जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे हे जगासाठी सुद्धा आहे . कारण आधी निवडून यायच्या आधी ट्रम्प यांनी नो वॉर अगेन आणि ( Maga ) मेक अमेरिका ग्रेट अगेन अशा घोषणा दिल्या आणि काम केले उलट . पण हे कोणत्याही राजकीय नेत्याने असे वागणे नवीन नाही पण जागतिक राजकारण आणि अर्थकारणावर अमेरिकेची पकड आणि वर्चस्व असल्याने त्याचा परिणाम हा इतर देशांवर होत असतो .

ट्रम्प यांनी टॅरिफ युद्ध छेडले , व्हेनेझुएला ताब्यात घेतले , ग्रीनलँड ताब्यात घेण्याची इच्छा प्रकट केली , इराणवर युद्ध पुकारले , युद्धाचे नियम मोडले , जगाच्या व्यापारावर टांगती तलवार ठेवली , त्यांच्या निर्णयामुळे अनेक निष्पाप लोकांना आपला कारण नसताना जीव गमवावा लागला . आत्ममग्न आणि स्वकेंद्रित स्वभावामुळे त्यांनी जगाला त्रासच दिला ..त्यांच्या एकाही निर्णयाने जगात आनंदाची भर पडली नाही . अमेरिकेत त्यांचे चाहते मात्र खुश असतील किंवा काही निर्णय अमेरिकेच्या भल्यासाठी असतील पण जगाच्या पदरात ट्रम्प यांनी निराशाच टाकली आहे . अर्थात हे अमेरिकेचे गुणधर्मच आहेत .

 

 

Web Title: Us midterm elections trump political test congress 2026cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Marathi News
  • US election updates
  • voting news

संबंधित बातम्या

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन
1

Major Rishabh Singh Sambyal: देशसेवेनंतर ग्लॅमरस वर्ल्डमध्ये पाऊल! ‘या’ प्रसिद्ध नॅशनल क्रशने ब्रँडसोबत केले कोलॅबोरेशन

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
2

Nagpur News : ट्रान्सफार्मरमधील ऑईल चोरणारे जेरबंद; २१ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख
3

Siddharth Gupta Birthday Special: वाढदिवशी खास चर्चा! ‘कृष्णावतारम्’मधील श्रीकृष्णाच्या भूमिकेने सिद्धार्थ गुप्ताला दिली नवी ओळख

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद
4

Nagpur News : भगवान भरोसे बाजारपेठा; वाहतूक कोंडीने हिरावला दिवाळीच्या खरेदीचा आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.