
भारत अन् इराणच्या व्यापारला मिळाली नवी गती! चाबहार बंदराचे पुतीनकडून तोंडभरुन कौतुक
INSTC हा रशिया आणि इराणमधील , 7,200 किमी लांबीचा मल्टी-मेडल वाहतूक मार्ग आहे. यामध्ये समुद्र, रेल्वे आणि रस्ते मार्गाचा समावेश असून याचा भारताला इराण आणि कॅस्पियन सागरद्वारे रशिया-युरोपला जोडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे भारत-रशिया-युरोप व्यापाराला नवी गती मिळणार आहे. यामुळे स्वस्त, जलद आणि कमी वेळात व्यापार करता येणार आहे.
नुकतेच इराणची राजधानी तेहरान येथे उच्चस्तरील बैठक पार पडली. या बैठकीत इराणचे सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल आणि रशियाचे वाहतूक मंत्रालयाने INSTC वर सविस्तर चर्चा केली. या प्रकल्पातील सरकारी, कायदेशीर आणि पायाभूत अडथळ्यांचे निराकरण करण्यावर आणि हा प्रकल्प लवकरात लवकर अंमलात आणण्यावर भर देण्यात आला. इराणने या प्रकल्पासाठी लागणारी जमीन डिसेंबरच्या अखेरीस देण्याचे आश्वासन दिले आहे.
चाबहार बंदर भारतासाठी धोरणात्मक दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. या बंदारामुळे भारत पाकिस्तानला वगळून मध्य आशिया आणि अफगाणिस्तानशी व्यापार करु शकतो. यामध्ये INSTC ची भर पडल्यास भारताची धोरणात्मक भूमिका अधिक मजबूत होणार आहे. रशियासाठी देखील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे रशियाला दक्षिण आशियाचे दरवाजे खुले होणार आहेत. या बंदराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधिक वाढणार आहे.
रशियाच्या या निर्णयामुळे भारत आणि इराणच्या व्यापार धोरणाल मोठी मदत मिळणार आहे. इराण ट्रान्झिट हब म्हणून ओळख निर्माण होणार आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तर भारतासाठी हा प्रकल्प आशिया-युरोप व्यापारासाठी गेम चेंजर ठरणार आहे.
Ans: चाबहार बंद हा भारताद्वारे चालवला जातो. हा मार्ग भारतासाठी दक्षिण आशियाई देशांना जोडण्यासाचे महत्त्वाचे कार्य करतो. या कॉरिडोमधून आता रशिया आणि इराण INSTC वाहतूक सुरु करणार आहे, ज्यामुळे भारत-रशिया-युरोप दरम्यान मालवाहतुकाचा खर्च आणि वेळ कमी होईल.
Ans: नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC) हा इराण आणि रशियातील 7,200 किमी लांबीचा मल्टी-मेडल वाहतूक मार्ग आहे.
Ans: भारत आणि इराणला याचा मोठा फायदा होणार आहे. आशिया-युरोप व्यापारात हा प्रकल्प भारताला धोरणात्मक मजबूती देईल तर इराणला ट्रान्झिट हब म्हणून ओखळले जाईल.