Russia to hire Indian workers amid industrial workforce shortages say Indian envoy
India Russia Relations : मॉस्को/नवी दिल्ली : सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये तणावाचे वातावरण आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आणि बेकायदेशी स्थलांतरितांना देशातून हद्दपार करण्याचा निर्णयाचा परिणाम सर्वाधिक भारतीयांवर होत आहे. यामुळे भारत आणि कॅनडासारख्या देशांमध्ये नोकरी करणाऱ्यांवरही याचा परिणाम होत आहे. पण आता तुम्हाला नोकरीच्या शोधात अमेरिकेत जाण्याची गरज नाही. यामागचे कारण म्हणजे रशियाने भारतीयांसाठी नोकरीचे नवे पर्याय खुले केले आहेत.
रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता रशिया भारतीयांसाठी अनेक महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये नोकरीसाठी संधी उपलबध करत आहेत. यामध्ये विशेष करुन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरीसाठी संधी मिळेल. रशियातील कंपन्याही भारतीय नागरिकांना नोकरी देण्यासाठी रस दाखवत आहेत.
ही दोस्ती तुटायची नाही! अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयावर ठाम
रशियाची सरकारी वृत्तसंस्था TASS ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विनय कुमार यांनी याबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या भारतावरील टॅरिफवरही मोठे विधान केले. त्यांनी भारताला जिथे चांगली डील मिळेल तिथून तेल खरेदी करत राहील हेही स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भारतीयांसाठी रशियामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचेही सांगितले. सध्या रशियातील भारतीय वाणिज्य दूतावास यावर लक्ष्य देत आहेत.
शिवाय अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांकडून रशियावर अनेक निर्बंध लादले जात आहे. तसेच स्थलांतरविरोधी अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनकडून कारवाई देखील केली जात आहे. अशा परिस्थिती या देशांमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे घरी परतण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
रशियाला सध्या मानवी भांडवलाची गरज आहे. कुशल कामगारांची गरज आहे. यासाठी रशिया भारताकडे पाहत आहे. रशियाने भारतीयांसाठी नियम, कायदे आणि कोटाच्या चौकटीत राहून नोकऱ्या देत असल्याचे विनय कुमार यांनी सांगितले आहे. भारतीय राजदूत विनय कुमार यांनी सांगितले की, सध्या रशियामध्ये तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये भारतीयांची मागणी वाढत आहे.
गेल्या काही काळात रशियामध्ये भारतीय समुदायाच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगारांचा यामध्ये समावेश आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, अंदाजे ही संख्या १४ हजार आहे. यामध्ये भारतीय वंशाचे १,५०० अफगाण नागरिकही आहेत.
तसेच रशियाच्या वैद्यकीय आणि तंत्रज्ञान संस्थांमध्ये ही ४,५०० विद्यांर्थ्यांची नोंद झाली आहे. सध्या रशियामध्ये ९० टक्के भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.