ही दोस्ती तुटायची नाही! अतिरिक्त टॅरिफनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयावर ठाम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Russia Relations : मॉस्को : सध्या रशियाकडून तेल खरेदीवरुन भारत आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त २५ टक्के दंडही लादला आहे. पण भारताने रशियाशी तेल व्यापार बंद करण्यास नकार दिला आहे. यामुळे ट्रम्प यांना सुरुवातील २५ टक्के लादलेला कर ५० टक्क्यापर्यंत वाढवला आहे. दरम्यान पुन्हा एकदा भारताने रशियाकडून तेल खरेदीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रशियातील भारताचे राजदूत यांनी यावर मोठे विधान केले आहे.
रविवारी रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी रशियाची सरकारी संस्था TASS ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहणार असल्याचे स्पष्ट केले. विनय कुमार यांनी म्हटले की, भारतातील तेल कंपन्या जिथे त्यांना स्वस्त दरात तेल मिळेल तिथूनच खरेदी करती. अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ हे अन्यायकारक आणि निराधार आहेत.
भारतावर का लादला आहे अतिरिक्त टॅरिफ; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी खुला केला ट्रम्पचा मास्टर प्लॅन
यापूर्वी देखील भारताने रशियन तेल खरेदीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते की, भारत केवळ राष्ट्रीय हितासाठी आणि जागतिक स्थिरतेसाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहे. भारताच्या रशियाकडून तेल स्वस्तात खरेदी केल्यामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये संतुलन आहे. यामुळे भारत राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलत राहिले, असे स्पष्ट करण्यात आले होते.
याच वेळी अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी ट्रम्पच्या भारतावरील टॅरिफचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांना रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवायचे आहे. यामुळे रशियावर दबाव आणण्याची रणनीतीचा वापर ट्रम्प करत आहे. यानुसार, ट्रम्प यांना रशियाची तेल निर्यात कमी करुन त्यांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करायचे आहे, यामुळे युक्रेन युद्ध थांबेल असा त्यांचा विश्वास आहे. व्हान्स यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थनही केले आहे.
दरम्यान भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे की, अमेरिका, युरोपीय देश, आणि चीन रशियाशी व्यापार करु शकतात तर भारत का नाही. शिवाय ट्रम्प यांनी २०१६ च्या काळात स्वत:हा जागितक स्थैर्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करण्यास सांगितले होते. यामुळे त्यांचा हा निर्णय अन्याकारक आणि निराधार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभमीवर भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यावर पुतिन यांनी ५% सुट दिली आहे.