Russia Ukraine war Russia strikes on ukriane more than 500 drones and missiles
Russia Ukriane War : गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ रशिया आणि युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) सुरु आहे. हे युद्ध थांबण्याचे नाव घेईना. रशिया सतत युक्रेनवर हल्ला करत आहे. बुधवारी १७ सप्टेंबर रोजी रशियाने युक्रेनवर ५०० हून अधिक हल्ले केले आहेत. यामुळे संपूर्ण युक्रेन हादरला आहे. रशियाने युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रे, ग्लाइड बॉम्बचा हल्ला केला असल्याचे म्हटले जात आहे.
पण याच वेळी एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. युद्ध एकतर्फी झाले असून युक्रेनकडून शरणागतीचे संकेत मिळाले आहे. हे संकेत अशा वेळी आले आहेत जेव्हा पुतिन यांनी सैन्याची कमांड हाती घेतली आहे.
नुकतेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी थेट युद्ध कक्षात जाणून सैन्याला मार्गदर्शने केले होते. पुतिन यांच्या आदेशनानुसार, रशियन सैन्याने युक्रेनवर हल्लेही केले. यामुळे युक्रेन सैन्याला हार मानला असल्याचे सांगितले जात आहे. काल पुतिन यांनी Zapad 2025 च्या लष्करी सरावात गणवेश परिधान करुन सैन्याला मार्गदर्शन केले होते. यावेळी त्यांनी लष्करातील शस्त्रांची पाहणी केली, विशेष करुन परदेशी लष्करी उपकरणे, यंत्रणेची बारकाईने तपासणी पुतिन यांनी केली.
याच वेळी पुतिन यांच्या सैन्याची कमांड हाती घेताच युक्रेनकडून युद्धबंदीला सहमती मिळाली असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अटींशिवाय पुतिन यांना भेटण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी तयार असल्याचे सांगितले जात आहे. झेलेन्स्की पुतिन समोर झुकल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र अद्याप यावर युक्रेनकडून किंवा रशियाकडूनही कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. यामुळे केवळ युक्रेन रशियाला शरण गेल्याच्या अटकळी बांधल्या जात आहेत.
दरम्यान रशियाने बुधवारी (१७ सप्टेंबर) रात्री युक्रेनवर तीव्र हवाऊ हल्ले केले हेत. या हल्ल्यांनी युक्रेनचे अनेक भाग हादरले आहे. सतत विस्फोट होत असून लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. युक्रेनने ५०० हून अधिक ड्रोन, ३०० ग्लाइड बॉम्ब आणि ३० क्षेपणास्त्रांचा मारा एका रात्रीत केला असल्याचे सांगितले जात आहे.
सांगितले जात आहे की, रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्वत: या हल्ल्यांवेळी सैन्याला मार्गदर्शन केले होते. यामुळे युक्रेन सैन्य आत्मसमर्पण करत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कोणत्याही अटींशिवाय युक्रेन युद्धबंदीसाठी सहमत असल्याचे म्हटले जात आहे.
रशियाने युक्रेनवर किती हल्ले केले?
रशियाने बुधवारी १७ सप्टेंबर रोजी ५०० हून अधिक ड्रोन, क्षेपणास्त्रे, ग्लाईड बॉम्बचे हल्ले केले आहेत.
युक्रेनने खरेच शरणागती पत्कारली का?
रशियाच्या काल झालेल्या हलल्यानंतर युक्रेनने कोणत्याही अटींशिवाय शरणागती पत्कारली असल्याचे म्हटले जात आहे, मात्र अद्याप युक्रेनकडून यावर कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.