
Trump to meet Zelensky after talks with Putin in Alaska
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) सोमवारी (१८ ऑगस्ट) वॉशिंग्टनला ट्रम्पच्या भेटीसाछी जाणार आहेत. यामध्ये हत्या आणि युद्ध संपवण्याबाबत चर्चा होईल असले झेलेन्स्कींनी म्हटले आहे. पुतिनशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी याची घोषणाही केली आहे. तसेच ट्रम्प यांनी पुतिनसोबतची चर्चा यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. परंतु या बैठकीत रशिया युक्रेन युद्धबंदीवर (Russia Ukraine War) कोणताही करार झाला नाही.
आता डोनाल्ड ट्रम्प झेलेन्स्कीशी चर्चा करणार आहे. यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष्य लागले असून यामध्ये युद्धबंदीवर ठोस निर्णय घेतला जाईल का असा प्रश्न उपस्थित केला आहे. १८ ऑगस्टला ही भेट वॉशिंग्टनमध्ये होण्याची शक्यता आहे. याशिवाय ट्रम्प नाटो संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अलास्काहून परतताना त्यांनी थोडक्यात चर्चा केली आहे. यामुळे तज्ज्ञांच्या मते लवकरच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धबंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी युरोपीय नेत्यांशी फोनवर दीर्घ चर्चा केली आहे.
अलास्कामध्ये झालेली ट्रम्प आणि पुतिन यांची चर्चा रशिया युक्रेन युद्धबंदीच्या पार्श्वभूमीवर अपयशी ठरली आहे. ट्रम्प यांनी आता रशिया युक्रेन युद्ध संपवणे हे झेलेन्स्कींवर अवलंबून आहे, यासाठी मी त्यांची लवकरच भेट घेार आहे. यामध्ये युरोपीय देशांचाही सहभागा असणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि पुतिन यांची अलास्कामधील चर्चा तब्बल तीन तास चालली
तज्ज्ञांच्या मते, या बैठकीचा परिणाम अप्रत्यक्षपणे भारतावर होण्याची शक्यता आहे. रशियन तेल खरेदीवर अमेरिकेने शुल्क लादले असून यामुळे भारतासमोर अनेक आव्हाने आहेत. भारत आणि रशियाच्या व्यापार संबंधावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताने सावध राहण्याची गरज आहे.