Pakistan Flood : पाकिस्तान आणि POK मध्ये पावसाचा हाहा:कार; पूर-भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan Flood : पाकिस्तान (Pakistan) आणि पाव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) गेल्या ३६ तासांत मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. आतापर्यंत ३२ हून अधिक लोकांचा जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले आहेत. तसेच अनेक लोक जखमीही झाले आहेत.
सध्या बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेणे आणि त्यांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे सर्वाधिक नुकसान खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये झाले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच कारकोरम आणि बालटिस्तान महामार्गही बंद झाले आहेत.
मेलानिया ट्रम्प जो बायडेनच्या मुलावर का संतापल्या? १ अब्ज डॉलर्सच्या मानहानीच्या खटल्याची दिली धमकी
मुसधार पावसामुळे सर्वात जास्त खैबर पथ्तुनख्वामध्ये विध्वंस झाले आहे. या भागात गेल्या २४ तांसात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहाना मुलांचाही समावेश आहे. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. तसेच बुनेर, मानशहरा, बाजौर, बटग्राम लोअर दीर आणि शांगला या जिल्ह्यांमध्ये बिटक परिस्थिती आहे.
पावसामुळे पाकिस्तानच्या पंजकोरा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. लोअर दिरच्या मैदानी भागातमध्ये एका घराचो छत कोसळल आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये महिला आणि लहाना मुलांचाही समावेश आहे. तसेच बाजौर जिल्ह्यात आणि सालारझाई भागांमध्ये देखील पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.
जबरारी गावात ढगफुटीमुळे देखील मोठा पूर आला आहे. या पूरामध्ये अनेक लोक वाहू गेले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु करण्यात आले असून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत पाच लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जिल्हा अधिकारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
तसेच पाकव्यपात काश्मीरमध्येही प्रचंड नुकसान झाले आहे. PoK च्या गिलगट-बाल्टिस्तानमध्ये पूराने थैमान मांडले आहे. अनेक घरे, वाहने, शाळा उद्ध्वस्त झाल्या आहेत. नीलम खोऱ्यातील पर्यटन भागामध्येही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. PoK च्या अनेक भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे.
बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. तेव्हापासून खैबर पख्तुनख्वा आणि उत्तरेकडील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे विस्थापन झाले आहे. अनेक भागात दाट वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. दिवस-रात्र बचाव कार्य सुरु आहे. परंतु बंद रस्ते आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.