Trump Putin Meet : पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर भांबावले पुतिन ; दिली अशी प्रतिक्रियी की व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump Putin Meet in Alaska : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अलास्कामध्ये बैठक पार पडली. शुक्रवारी (१५ ऑगस्ट) झालेल्या या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विशेष करुन ही बैठक रशिया आणि युक्रेन युद्धावर बंदीसाठी तोडगा काढण्यासाठी होती. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले होते. परंतु या बैठकीत युक्रेन युद्धावर कोणाताही ठोस निर्णय झाला नाही.
दरम्यान या बैठकीतील व्लादिमिर पुतिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही हावभावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. पण नेमकं अस का घडलं आहे.
तर अलास्कामधील पत्रकार परिषदेदरम्यान पुतिन यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणजे तुम्ही “नागरिकांची हत्या करणे थांबवाल का? (Will you stop killing Civilians?)”. या प्रश्नावर पुतिन भांबावलेले दिसले. यावरुन त्यांना हा प्रश्न ऐकू आला नाही की इंग्रजी समजले असा प्रश्न पडला. पण सध्या त्यांच्या या गोंधळलेल्या हावभावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
🇷🇺🇺🇸 President Putin’s reaction to the American media screaming over each other #Alaskapic.twitter.com/QPKpikDT8A
— Mr,CooL (@MR_COOL77777) August 15, 2025
यावर सोशल मीडियावर पुतिन यांना ट्रोल केले जात आहे. काहींनी खरे प्रश्न विचारल्यावर असाच गोंधळ उडतो, असे म्हटले आहे. तर काहींनी माझा मित्र/सहकारी मदत मागतो तेव्हा मी असाच बहाणा करुन उत्तर देत नाही असे म्हटले आहे. अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया लोक देत आहे. शिवाय पुतिन यांना इंग्रजी समते का किंवा इंग्रजी येते का अशीही चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
The handshake tug of war topped by Putin tapping his head 🤣🤣🤣pic.twitter.com/JLGB1SqQfn
— 🌋 (@EvrybodynthrMom) August 15, 2025
द लिंकन प्रोजेक्टने दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन यांना इंग्रजी येते कारण बैठकीदरम्यान ट्रम्प आणि पुतिन यांच्यात भाषेचा अनुवाद करणाऱ्या अधिकाऱ्याशिवाय गप्पा मारण्यात आल्या. त्यांच्यामध्ये विनोदही करण्यात आले. शिवाय विमानतळावर पुतिन यांचे स्वागत झाले तेव्हा दुभाषी प्रतिनिधी देखील तिथे नव्हता. शिवाय रशियाच्या एका माजी अमेरिकेन राजदूताने दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांचे इंग्रजी तितकेसे चांगले नाही परंतु ट्रम्पशी संवाद ते साधू शकतील.
शिवाय लिमोझिनमधून दोन्ही नेत्यांनी प्रवास केला तेव्हा त्यांनी काही ना काही चर्चा केली असणार आहे. तसे तरं ही या खासगी चर्चेत नेमकं काय घडलं हे अद्यापही गुपितच आहे. तसेच पत्रकार परिषदेच्या शेवटी देखील पुतिन, Next Time in Moscow? अले म्हणत ट्रम्प यांना आमंत्रणही दिले आहे.दरम्यान या तीन तासांच्या बैठकीत युक्रेनमध्ये युद्धबंदीवर ठोस निर्णय झाला नाही. परंतु ही चर्चा सफल ठरली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.