Russia-Ukraine War Ukraine agrees to ceasefire proposal
कीव: काल सौदी अरेबियामध्ये यूक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी सौदी अरेबियात बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकन अधिकारी, रशियन अधिकारी आणि यूक्रेनचे राष्ट्राध्य उपस्थित होत. या बैठकीत एक मोठा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष 30 दिवसांच्या युद्धविरामासाठी तयार झाले आहेत. मात्र, अद्याप रशियाने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रशियाची सहमती मिळवण्यासाठी अमेरिका पुतिन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. रशियाने सहमती दर्शवताच तातडीने युद्धबंदी लागू करण्यात येणार आहे.
अमेरिका यूक्रेन बैठकीतील महत्वपूर्ण मूद्दे
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या युद्धाच्या समाप्तीसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे झालेल्या या चर्चेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वालट्झ यांनी यूक्रेन अधिकाऱ्यांशा अनेक महत्त्वाचा मुद्द्यावर चर्चा केली. मात्र, रशियाच्या ताब्यात असेलेल्या प्रदेशांच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्यास यूक्रेनियन अधिकाऱ्यांनी नकार दिला. रशियाला पूर्व यूक्रेनमधील डोनेट्स्क, लुहान्स्क, खेरसॉन आणि झापोरिझिया या चार प्रमुख भागांवर संपूर्ण नियंत्रण हवे आहे. सध्या यूक्रेनच्या 20% भागावर रशियाने ताबा मिळवला आहे.
युद्धविरामातील प्रस्तावानुसार, हवाई आणि समुद्री क्षेत्र वगळून इतर क्षेत्रांमध्ये बंदी लागू केली जाईल. शिवाय, अमेरिका रशियाला युद्धविरामासाठी तयार करण्याचा प्रयत्न करेल. युक्रेन आणि अमेरिकेने लष्करी मदत व गुप्तचर माहिती सामायिक करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय, दोन्ही देशांमध्ये दुर्मिळ खनिजांच्या व्यापारासंदर्भात करार पूर्ण करण्यावरही जोर दिला गेला.
ट्रम्प यांच्याशी केलेल्या वादावर झेलेन्स्कींना पश्चात्ताप
झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 04 मार्च रोजी अमेरिकेच्या व्हाईट हाउसमध्ये चर्चा झाली. मात्र ही चर्चा अपेक्षित स्वरुपाची नव्हती. यादरम्यान झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात मोठा वाद झाला. यावर खेद व्यक्त करत झेलेन्स्कींनी यूक्रेनच्या शांततेसाठी करार करण्यास तयार असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी यूक्रेनची लष्करी मदत थांबवली असून त्यानंतर झेलेन्स्कींचे हे वक्तव्य समोर आले आहे.
ट्रम्प झेलेन्स्कींवर नाराज
व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ही मदत तेव्हाच पुन्हा सुरू केली जाईल, जेव्हा ट्रम्प यांना खात्री पटेल की झेलेन्स्की खरोखरच शांती साध्य करू इच्छित आहेत. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून झेलेन्स्कीवर टीका केली होती. त्यांनी म्हटले की, झेलेन्स्की युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा असताना शांतीसाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे हा झेलेन्स्की यांचा सर्वात वाईट निर्णय आहे, जो अमेरिका सहन करणार नाही.