Russia-Ukraine War: झेलेन्स्कींचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे; शांतता चर्चेपूर्वी रशियावर मोठा हल्ला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को: गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेले रशिया-यूक्रेन युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालले आहे. दोन्ही देश एकमेकांवर सातत्याने हल्ले करत आहे. जागतिक स्तरावर हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान सौदी अरेबियात यूक्रेन रशिया शांततेसाठी झेलेन्स्की सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सची भेट घेणार आहे. एकीकडे झेलेन्स्की शांततेसाठी प्रयत्न करत असताना यूक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या विविध भागांवर ड्रोन हल्ले केले आहेत. मॉस्कोसह अनेक शहरांमध्ये या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या हल्ल्यामुळे शांतता चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सौदी अरेबियात रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान शांतता चर्चा होणार आहे. यासाठी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियन अधिकारी सौदी अरेबियात पोहोचले आहे. मात्र, शांतता चर्चा होण्यापूर्वीच यूक्रेनच्या सैनिकांनी रशियाला ड्रोन हल्ले करत हादरवून टाकले आहे. यूक्रेनने मंगळवारी मास्कोवर मोठा हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकच वेळी 70 ड्रोन यूक्रेनने रशियावर डागले आहेत.
रशियाच्या शहरांना लक्ष्य
यूक्रेनने रशियावर सुमारे एक तास सातत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये मॉस्कोतील अनेक निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. मॉस्कोजवळील कोलोन्मा आणि डोमोडेदोवोमध्ये अनेक हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमुळे चर्चेपूर्वींच झेलेन्स्कींच्या हेतूंबद्दल विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
यूक्रेनचे हल्ले सुरुच
रशियन संरक्षण दलाने म्हटले आहे की, त्यांनी आतापर्यंत 58 ड्रोन नष्ट केले आहेत. मात्र यूक्रेन सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यांमुळे मॉस्को विमानतळ बंद करण्यात आले असून अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही. मात्र याचा मोठा परिणाम शांतता चर्चेवर होईल असे म्हटले जात आहे.
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेला हा रशिया-यूक्रेन संघर्ष मिटवम्यासाठी अमेरिकन, यूक्रेनियन आणि रशियन अधिकारी आज सौदी अरबेयात चर्चा करतील. या बैठकीत यूद्धबंदीच्या कराराची अपेक्षा आहे. शांतता चर्चेपूर्वी अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे, मात्र झेलेन्स्की या चर्चेसाठी उपस्थित नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला होता.
यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष मंगळवारी (11 मार्च) सौदी अरेबियाला पोहोचले आहेत. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांचे स्वागत केले. जेद्दाला रवाना होण्यापूर्वी, झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेत केलेल्या प्रयत्नांबद्दल सैदी अरेबियाचे आभार मानले आणि मध्यस्थीमध्ये मोहम्मद बिन सलमान यांच्या भूमिकेचे कौतुक केले.