Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Russia Ukraine War: पुतीनची समजूत घालण्यात सगळेच अपयशी, मॅक्रॉन म्हणाले, ‘आता भारतानेच पुढाकार घ्यावा अन्…’

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासोबत पॅरिसमध्ये भारत, ब्राझील आणि चीनला रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी रशियावर दबाव आणण्याचे आवाहन केले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 06, 2025 | 10:27 AM
रशिया - युक्रेन युद्धात भारताने पुढाकार घ्यावा फ्रेंच अध्यक्षांची विनवणी (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

रशिया - युक्रेन युद्धात भारताने पुढाकार घ्यावा फ्रेंच अध्यक्षांची विनवणी (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us
Follow Us:

रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेसाठी प्रयत्न तीव्र होत आहेत. याच अनुषंगाने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पॅरिसमध्ये ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासोबत संयुक्त निवेदनात भारत, ब्राझील आणि चीनला विशेष आवाहन केले आहे. मॅक्रॉन म्हणाले की, या देशांनी संयुक्तपणे रशियावर दबाव आणावा जेणेकरून युद्ध संपेल आणि चर्चेचा मार्ग मोकळा होईल. 

मॅक्रॉन यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘आपण सर्वांनी – अमेरिकन, ब्राझिलियन, चिनी, भारतीय – हे युद्ध संपविण्यासाठी रशियावर दबाव आणावा. संघर्ष पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला स्पष्ट आणि सरळ रणनीतीची आवश्यकता आहे.’ त्यांनी थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आरोप केले आणि सांगितले की पुतिन युद्ध थांबवण्यास तयार नाहीत. त्याच वेळी, त्यांनी असेही सांगितले की युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सौदी अरेबियात झालेल्या बैठकीत अमेरिकेचा युद्धबंदी प्रस्ताव स्वीकारला होता. 

Russia Ukraine War: युक्रेनचा विनाश अटळ! ट्रम्पच्या चर्चेदरम्यान पुतीनने दिला इशारा; एअरबेस हल्ल्याचा बदला घेणारच

भारताची भूमिका काय आहे? 

रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताने सुरुवातीपासूनच संतुलित आणि राजनैतिक भूमिका स्वीकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की भारत तटस्थ नाही, परंतु शांततेच्या बाजूने ठाम आहे. भारताने वारंवार संवाद आणि शांततापूर्ण तोडग्याचे समर्थन केले आहे. भारत आणि रशियामध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी आहे, विशेषतः संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात. पाश्चात्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांनंतरही, भारत रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करत राहिला. युद्धापूर्वी भारताला रशियाकडून १६ दशलक्ष बॅरल तेल मिळाले, जे युद्धानंतर ३४ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त झाले.

पंतप्रधान मोदींनी आधीच दोन्ही देशांना भेट देऊन वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची तटस्थ पण संतुलित भूमिका संभाव्य शांततेसाठी मध्यस्थ बनवू शकते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी मागणी आहे की भारताने रशियाला चर्चेसाठी येण्यास भाग पाडण्यासाठी आपल्या भूमिकेचा वापर करावा. यातून योग्य मार्ग निघण्याची आशा आता वर्तविली जात आहे. 

Russia Ukraine War: युक्रेनकडून मोठी चूक! रशियाच्या गोदामातून निघाला अक्राळविक्राळ ‘राक्षस’, जग पाहणार विनाशाचा ट्रेलर

युद्धविराम शक्य आहे का?

अमेरिकेच्या मध्यस्थीखाली तुर्कीमध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये वाटाघाटी निश्चितच सुरू आहेत, परंतु रशिया अजूनही बिनशर्त युद्धविराम स्वीकारण्यास तयार नाही. युक्रेनने क्रिमिया, डोनबास, खेरसन आणि झापोरोझ्ये यांना रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी अशी पुतिन यांची मागणी आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की युद्धविरामादरम्यान, रशिया पुन्हा आपले सैन्य मजबूत करण्याची संधी घेईल. अशा परिस्थितीत, सध्या युद्ध थांबण्याची आशा कमी आहे असेच सध्याचे चित्र दिसून येत आहे. तर भारताने यात पुढाकार घ्यावा असे ब्राझीलच्या अध्यक्षांचे म्हणणे असल्याचे आता समोर आले आहे. 

Web Title: Russia ukraine war update putin is not ready to listen emmanuel macron appeals peace and help from inda china brazil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Russian President Putin
  • World news

संबंधित बातम्या

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार
1

Marco Rubio: 3 दिवसांच्या भारत यात्रेसाठी मुंबईत धडकले मार्को रुबियो, जयशंकरसह करणार बैठक; जामनगरलाही जाणार

Sheikh Hasina: ‘मला मारा किंवा बंदिस्त करा डिसेंबरमध्ये बांगलादेशात येत आहे…’, शेख हसीनाची मोठी घोषणा
2

Sheikh Hasina: ‘मला मारा किंवा बंदिस्त करा डिसेंबरमध्ये बांगलादेशात येत आहे…’, शेख हसीनाची मोठी घोषणा

Columbia News: कोलंबिया हादरलं! सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 14 ठार अनेक जण जखमी
3

Columbia News: कोलंबिया हादरलं! सोन्याच्या खाणीत दुर्घटना, 14 ठार अनेक जण जखमी

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?
4

World Politics: ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा खेळ; चारपैकी 3 देशांत केला सत्तापालट, आता इस्त्रायलमध्ये काय होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.