Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रशियाचे MI-18T हेलिकॉप्टर 22 जणांसह बेपत्ता; शोध मोहिम सुरू

रशियात एक हेलिकॉप्टर 22 जणांसह उड्डाण केल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना स्थानिक माध्यामांनी शनिवारी याची माहिती दिली. हे हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच रडारवरून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2024 | 11:41 AM
रशियाचे MI-18T हेलिकॉप्टर 22 जणांसह बेपत्ता; शोध मोहिम सुरू

रशियाचे MI-18T हेलिकॉप्टर 22 जणांसह बेपत्ता; शोध मोहिम सुरू

Follow Us
Close
Follow Us:

मास्को: रशियात एक हेलिकॉप्टर 22 जणांसह उड्डाण केल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती देताना स्थानिक माध्यामांनी शनिवारी याची माहिती दिली. हेलिकॉप्टरमध्ये 19 प्रवाशांशिवाय इतर 3 क्रू मेंबर्स होते. हे हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच रडारवरून गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टर सुदूर पूर्वेकडील कामचटका प्रदेशातील वचकाझेट्स ज्वालामुखीजवळ उड्डाण करत असताना बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

MI-18T हेलिकॉप्टर बेपत्ता 

रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विटिया-एरो एअरलाईनचे MI-18T हे हेलिकॉप्टर सकाळी 7.15 वाजता उड्डाण केले होते. यामध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 19 प्रवासी होते. विमानाने झेप घेतल्यानंतर काही वेळातच संपर्क तुटला. आपात्काली सेवांनुसार, MI-8T टेकऑफनंतर काही वेळातच रडारवरून गायब झाले.मात्र संपर्क तुटण्यापर्वी क्रू मेंबर्स ने कोणतीही समस्या नोंदवली नव्हती. मीडिया रिपोर्ट्स असेही सूचित करतात की कामचटका हायड्रोमेटिओलॉजिकल सेंटरने निकोलायव्हका विमानतळाच्या परिसरात कमी दृश्यमानता नोंदवली, जिथे हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला होता.

Reuters reports, “A Russian helicopter with three crew members and 19 passengers on board has gone missing in the far eastern peninsula of Kamchatka (Russia), Interfax news agency reported on Saturday, citing preliminary data from the federal air transport agency. The Mi-8T…

— ANI (@ANI) August 31, 2024


बचाव कार्य सुरू 

सध्या रहस्यमयीरित्या बेपत्ता झालेल्या हेलिकॉप्टरचा शोध सुरू आहे. यासाठी आणखी एक विमान पाठवण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. यासाठी एक समिती स्खापन करण्यात आली आहे. या समितीने वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि हवाई वाहतुकीच्या संचालनाशी संबंधित फौजदारी संहितेच्या कलम 263 अंतर्गत घटनेची चौकशी सुरू केली आहे. बचाव कार्यासाठी वोलिन आणि निकोलायव्हकाच्या वस्तीत बचाव पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

50 पेक्षा जास्त देशांनी वापरले 

Mi-8T हे ट्विन-इंजिन हेलिकॉप्टर आहे जे 1960 मध्ये डिझाइन केले गेले होते. हे रशिया आणि शेजारच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, जेथे त्याच्याशी संबंधित अपघात अनेकदा होतात. MI-8T हे हेलिकॉप्टर जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टरपैकी एक आहे. 1967 मध्ये रशियन सैन्याने ते पहिल्यांदा वापरले. या हेलिकॉप्टरी 17 हजारांहून अधिक युनिट्स बनवली आहेत. आत्तपर्यंत 50 पेक्षा जास्त देशांनी याचा वपर केला आहे. यापूर्वी देखील MI-8T अनेक अपघातांना बळी पडले आहे.

Web Title: Russian mi 18t helicopter goes missing with 22 on board nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 11:41 AM

Topics:  

  • helicopter crash
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
1

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
2

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
3

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
4

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.