
Japan Deploys Deadly Type-12 Missiles Near China Amid Iran War
मिळालेल्या माहितीनुसार, जपान(Japan) ने चीनच्या सीमेजवळ आपल्या लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांची तैनाती केली आहे. जपानच्या या पावलामुळे आशिया खंडातही लष्करी युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवारी (09 मार्च 2026) पहाटे जपानच्या कुमामोटो प्रांतात एका लष्करी तळावर अवजड वाहनांचा ताफा दाखल झाला आहे. जपानने अत्यंत गुप्तपणे हे ऑपरेशषन केले असून स्थानिक प्रशासनालाही याची कल्पना नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार, या ताफ्यात Type-12 या प्रगत क्षेपणास्त्राचे लाँचर्स आहे. मार्च अखरेपर्यंत ही यंत्रणा सुरु करण्याचा जपानचा उद्देश आहे. मात्र जपानच्या या पावलामुळे चीन(China) चा संताप उफाळण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने केवळ संरक्षणात्मक पवित्रा घेतला होता. परंतु नुकत्याच चीनच्या सीमेजवळ क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या निर्णयामुळे हे थेट चीनला युद्धाचे आव्हान मानले जात आहे. अद्याप मध्यपूर्वेतील संघर्ष संपलेला नसताना जपानच्या या कृतीमुळे पूर्व आशियातही युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जगाची डोकेदुखी वाढणार आहे.
Ans: जपानने Type-12 लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे कुमामोटो प्रांतातील आर्मी कॅम्पमध्ये तैनात केली आहेत, जे चीनच्या दिशेने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
Ans: सुरुवातील या क्षेपणास्त्राची क्षमता 200 किमी पर्यंत मारा करण्याची होती, परंतु आता ती वाढवून 1000 किमीपर्यंत करण्यात आली आहे.
Ans: चीन आणि जपानमध्ये गेल्या काही काळात तैवान आणि सेनकाकू बेटांवरुन वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर जपानने आपली संरक्षण क्षमता आणि प्रतिहल्लाची क्षमात वाढवण्यासाठी चीनच्या सीमेजवळ क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत.