Russian President Putin gifted Mark Warren an expensive bike
Putin Trump Alaska Meet : वॉशिंग्टन : शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक पार पडली. या बैठकीचा उद्देश रशिया युक्रेन युद्धावर शांतता करार करणे होता. पण यावेळी कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दरम्यान ही बैठक सर्वत्र चर्चेचा विषय बनली. तसेच या बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण आणि विचित्र गोष्टी देखील सर्वत चर्चेत होत्या.
सध्या आणखी एका व्यक्तीची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. या व्यक्तीला व्लादिमिर पुतिन यांनी महागडे गिफ्ट दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसाप, अलास्कामधील मार्क वॉरेन यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांचे जीवन एका महागड्या गिफ्टने बदलेले गेले आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन अलास्कात ट्रम्प च्या भेटीस गेले असताना त्यांनी मार्क वॉरेन यांना पाहिले. यावेळी ते त्यांच्या जुन्या सोव्हिएत काळातील मोटासायकलने कामकाज करायचे. पण तुम्हाला आता मार्क वॉरेन कोण आहे? असा प्रश्न नक्की पडला असेल.
पाकिस्तानात खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी तुरुंगातून साधला मोठा डाव; शाहबाजची उडाली झोप
मिळालेल्या माहितीनुसार, मार्क वॉरेन एक निवृत्त अग्निशमन अधिकारी आहे. मार्क त्यांच्या दैनंदिन कामासाठी सोव्हिएत काळातील जुन्या बाईकचा वापर करतात. या बाईक्स पार्ट्स देखील आता कठीण आहे. याचा कारखाना सध्या केवळ युक्रेनमध्ये आहे. पुतिन अलास्कामध्ये ट्रम्प यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी मार्ककडे ही बाईक पाहिली. त्यांनी मार्क वॉरेनचे कौतुकही केले. यानंतर मार्क वॉरेन आणि त्यांची सोव्हिएत काळातील बाईक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली.
याचा व्हिडिओ व्लादिमिर पुतिन यांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर पुतिन यांनी मार्क वॉरेनशी संपर्क साधला. त्यांना मार्कला एक नवीन उराला मोटारबाईक भेट दिली. या नव्या बाईकची किंमत तब्बल २२ हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये १८ लाख आहे. मार्क यांना ही किंमत ऐकून विश्वास बसला नव्हता. तसेच एवढे महागडे गिफ्ट आपल्याला कोण देणार, यामुळे त्यांना हा फसवणुकीचा प्रकार वाटला. पण पुतिन आणि ट्रम्प यांच्या भेटीनंतर रशियाच्या दूतावासाने मार्कशी संपर्क साधला.
मार्क यांना बाऊक गिफ्ट देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र रशियामध्ये एकच खबळ उडाली होती. मार्क कधीही पुतिन यांना भेट नाही, परंतु त्यांनी यावर आनंद व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, मला माझी जुनी बाईक खूप प्रिय आहे. पण ही नवी बाईक त्याच्यापेक्षा खूप छा आहे. मला वाटते मी स्वप्नात आहे, मी खूप आनंदी आहे, असे त्यांनी म्हटले.
पण या गिफ्टवर सर्वत्र वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी मार्क यांना पुतिनकडून कोणतीही भेट न घेण्याचे म्हटले आहे. हा रशियन प्रचाराचा एक भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण मार्क यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच यामध्ये त्यांना काहीही तोटा नाही असे त्यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी मला गिफ्ट दिलं आहे, त्यांना माझ्याकडून काहीही मिळणार नसताना. सध्या हा विषय जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनला आहे.
पाकिस्तान आणि सौदीपेक्षाही क्रूर निघाला मलेशिया ; नमाज न अदा केल्यास देणार कठोर शिक्षा