Russian President Putin to visit India soon to strengthen bilateral ties know the detail
मॉस्को: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत रशिया-युक्रेन युद्धनंतर हा त्यांच्या पहिलाच भारत दौरा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी रशिया दौऱ्यादरम्यान पुतिन यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते, जे आता त्यांनी स्वीकारले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पुतिन यांच्या भारत भेटीची तयारी सुरु असल्याची पुष्टी केली. मात्र, अद्याप त्यांच्या भेटीची तारिख जाहीर करण्यात आलेली नाही.
लावरोव्ह यांनी, अध्यक्ष पुतिनि यांनी भारतीय पंतप्रधानांचे आमंत्रण स्वीकारले असल्याचे सांगितले. ही भेट अत्यंत महत्वपूर्ण असमार आहे. यादरम्यान भारत आणि रशियामधील संबंध आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा रशियाच्या अध्यक्षांचा पहिला भारत दौरा आहे.
पुतिन यांच्या या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन झाल्यानंतर झालेले जागतिक बदल आणि इतर काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनसोबतच्या पॉडकास्ट दरम्यान म्हटले होते की, हा युद्धाचा काळा नाही, युद्धाने फक्त विनाशच होतो. शिवाय रशियाविरुद्ध संयुक्त राष्ट्रांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवर भारताने मतदान केलेले नाही. बारताने पुतिन यांच्यावर सार्वजनिक टीका करण्याचे नेहमीच टाळले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये यूक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली होती. या काळात दोन्ही देशांत तीव्र संघर्ष सुरु होता आणि इतर कोणत्याही देशांनी कोणा एकाच्या बाजूनेही बोलायची हिम्मत दाखवली नव्हती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील कझानमध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेलाही उपस्थिती दर्शवली होती. पुतिन यांच्या आगीम भारत दौऱ्यामुळे भारत आणि रशियातील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामांवर नवीन चर्चेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी यापूर्वी 06 डिसेंबर 2021 मध्ये मध्ये भारताला भेट दिली होती. यावेळी ते फक्त चार तासांसाठी भारतात आले होते. या भेटीदरम्यान भारत आणि रशियामध्ये 28 महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये लष्करी आणि तांत्रिक करारांचाही समावेश होता. दरम्यान पुन्हा एकदा ती वर्षानंतर व्लादिमिर पुतिन भारत दौऱ्यावर येणार असून या भेटीदरम्यान रशिया-युक्रेन युद्धावर काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.