Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

S Jaishankar : विज्ञानातील ‘ऐतिहासिक विकृती’ आता संपणार! परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये मांडली परखड भूमिका

१५ मे पर्यंत संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित या प्रदर्शनाचा उद्देश, भारतीय उपखंडात जन्मलेल्या गणितीय संकल्पना आजही सुसंगत आहेत आणि त्या जागतिक डिजिटल पायाभूत सुविधा व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) आधार आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 13, 2026 | 03:32 PM
s jaishankar un exhibition indian mathematics zero to infinity 2026

s jaishankar un exhibition indian mathematics zero to infinity 2026

Follow Us
Follow Us:
  • ऐतिहासिक उद्घाटन
  • ऐतिहासिक विकृती दुरुस्त करण्याचा प्रयत्न
  • AI आणि डिजिटल युगाचा आधार

S Jaishankar UN Speech New York : जागतिक राजकारणात भारताचे वजन वाढत असतानाच आता भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेनेही संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर आपली मोहोर उमटवली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) यांनी न्यूयॉर्कमध्ये एका अशा प्रदर्शनाचे उद्घाटन केले, जे जगाला हे सांगते की आज आपण ज्या ‘डिजिटल युगात’ जगत आहोत, त्याचे बीज हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषी आणि गणितज्ज्ञांनी रोवले होते. ‘शून्यापासून अनंतापर्यंत गणितातील भारतीय संस्कृतीचे योगदान’ असे शीर्षक असलेल्या या प्रदर्शनाने जागतिक राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

संकुचित दृष्टिकोन बदलण्याची वेळ!

प्रदर्शनाचे उद्घाटन करताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अत्यंत परखड मते मांडली. ते म्हणाले की, “दीर्घकाळापासून जगाने वैज्ञानिक प्रगतीकडे एका विशिष्ट चौकटीतून आणि संकुचित भूगोलाच्या मर्यादेत पाहिले आहे. विज्ञानाचा इतिहास सांगताना भारतासारख्या प्राचीन संस्कृतींच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले किंवा ते कमी लेखण्यात आले. ही एक ‘ऐतिहासिक विकृती’ आहे आणि ती आता दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.” ज्याप्रमाणे आज जगाचे राजकीय आणि आर्थिक पुनर्संतुलन होत आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक पुनर्संतुलन होणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dirty Bomb: युद्धाचा नवा आणि सर्वात धोकादायक अंक; इराणचा ‘डर्टी बॉम्ब’ प्लॅन काय? 440 किलो युरेनियम आणि अमेरिकेची लष्करी तयारी

प्राचीन ‘संहिता’ आणि आजचा ‘अल्गोरिदम’

या प्रदर्शनात ‘संहिता’ प्रकल्पांतर्गत दक्षिण आशियाई हस्तलिखितांचा संग्रह प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये केवळ शून्यच नाही, तर दशांश स्थान पद्धती, बीजगणित, त्रिकोणमिती आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा प्राचीन भारतीय पुरावा (बौधायन प्रमेय) जगासमोर मांडला आहे. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, आपण केवळ भिंतीवरचे आकडे पाहत नसून मानवी प्रगतीचा पाया पाहत आहोत. आजचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) ज्या अल्गोरिदमवर चालते, त्याची मुळे भारताच्या प्राचीन गणितीय पद्धतींमध्ये आहेत, हे या प्रदर्शनाचे सर्वात मोठे यश आहे.

My remarks at the exhibition ‘From Shunya to Ananta’ at the @UN, showcasing India’s contribution to mathematics
https://t.co/vaxPTnhJim
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 12, 2026

credit – social media and Twitter

आर्यभट ते भास्कर: विद्वानांचा गौरव

प्रदर्शनात आर्यभट, ब्रह्मगुप्त आणि भास्कराचार्य यांसारख्या महान गणितज्ज्ञांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. केरळच्या खगोलशास्त्र आणि गणित शाखेने जगाला दिलेल्या योगदानाची माहिती पाहून अनेक देशांचे राजदूत थक्क झाले. प्रिन्स्टन विद्यापीठातील प्रसिद्ध गणितज्ज्ञ मंजुल भार्गव यांची उपस्थिती या प्रदर्शनाचे महत्त्व अधिक वाढवणारी ठरली. हे प्रदर्शन १५ मे पर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जगभरातील लोकांसाठी खुले राहणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Dirty Bomb: युद्धाचा नवा आणि सर्वात धोकादायक अंक; इराणचा ‘डर्टी बॉम्ब’ प्लॅन काय? 440 किलो युरेनियम आणि अमेरिकेची लष्करी तयारी

 भविष्याचा वेध घेणारा वारसा

हे प्रदर्शन केवळ भूतकाळाचे गोडवे गाण्यासाठी नाही, तर भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करण्यासाठी भारताकडे असलेली बौद्धिक क्षमता सिद्ध करण्यासाठी आहे. जयशंकर यांच्या या दौऱ्याने आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनाने हे सिद्ध केले आहे की, भारत आता केवळ एक बाजारपेठ नसून जगाला दिशा देणारी ‘बौद्धिक महासत्ता’ म्हणून उभा राहत आहे.

Web Title: S jaishankar un exhibition indian mathematics zero to infinity 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • New York city
  • S. Jaishankar
  • S.Jaishankar News

संबंधित बातम्या

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार
1

IIT Bombay in New York: आता अमेरिकेत वाजणार आयआयटी बॉम्बेचा डंका! न्यूयॉर्कमध्ये सब-कैंपससाठी झाला सामंजस्य करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.