Saudi Arabia has increased the life expectancy of its citizens from 46 to 79 years
सौदी अरेबियाचे नागरिक १९६० मध्ये फक्त ४६ वर्षे जगत होते; आता सरासरी आयुर्मान ७९ वर्षे झाले आहे.
आरोग्य सुविधा, पोषण, जीवनशैलीतील बदल आणि व्हिजन २०३० योजनेमुळे नागरिकांचे दीर्घायुष्य साध्य झाले.
सौदी सरकारचे ध्येय २०३० पर्यंत नागरिकांचे आयुर्मान ८० वर्षांपर्यंत नेणे.
Saudi life expectancy rise : सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांच्या जीवनमानात ऐतिहासिक बदल घडवून आणला आहे. कधीकाळी १९६० च्या दशकात एखाद्या सौदी नागरिकाचे सरासरी आयुर्मान फक्त ४६ वर्षे होते. मात्र, गेल्या काही दशकांत केलेल्या आरोग्य सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञान, पोषण आणि जीवनशैलीतील बदलामुळे आज हा आकडा ७९ वर्षांपर्यंत पोहोचला आहे. हा बदल केवळ आकडेवारीत नाही, तर समाजाच्या आरोग्य, अर्थव्यवस्था आणि मानसिकतेवर खोलवर परिणाम करणारा आहे. सौदी अरेबियाने “व्हिजन २०३०” अंतर्गत आपल्या नागरिकांचे आयुर्मान ८० वर्षे करण्याचे ध्येय ठेवले आहे.
१. आरोग्य सेवेचा खर्च कमी करणे : नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या केल्या गेल्या.
२. निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन : संतुलित आणि पौष्टिक आहारावर विशेष भर दिला गेला.
३. जुन्या आरोग्य व्यवस्थेचे आधुनिकीकरण : तंत्रज्ञान, जैविक औषधे आणि आधुनिक रुग्णालयांची निर्मिती.
४. आर्थिक आणि उत्पादनवाढ : आरोग्यदायी लोकसंख्या अधिक काळ काम करू शकते, त्यामुळे अर्थव्यवस्था बळकट झाली.
५. सामाजिक एकतेला चालना : वृद्ध लोक समाजाशी जोडलेले राहिले आणि त्यांचे योगदान सतत टिकले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जास्त काळ जगणे पुरेसे नाही, तर निरोगी जगणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी काही जीवनशैलीचे बदल आवश्यक आहेत:
दररोज शारीरिक हालचाल व व्यायाम
संतुलित व पौष्टिक आहार
पुरेशी आणि चांगली झोप
तणाव कमी करणे
वृद्धांसाठी सामाजिक आधार व सोयी
या साध्या सवयींमुळे नागरिक आजारांपासून दूर राहून अधिक आनंदी जीवन जगत आहेत.
अर्थशास्त्रज्ञ इब्राहिम अल-हिंदी यांच्या मते, नागरिकांचे आयुर्मान वाढले की लोक अधिक काळ काम करू शकतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते, राहणीमान सुधारते आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. यामुळे नवीन उद्योगांचीही निर्मिती झाली – जसे की वृद्धांची काळजी घेणारे उद्योग, विमा सेवा, जैविक औषधे आणि आधुनिक आरोग्य सुविधा.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Protests: नेपाळ सत्तापालटामध्येही अमेरिकेचा मोठा हाथ; 900 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक अन् Gen-Z आंदोलनाची पटकथा
आज जगभरात वृद्धत्वाची व्याख्या बदलत आहे. पूर्वी ६० वर्षांचा माणूस वृद्ध मानला जायचा, पण आता ७०-८० वर्षे हे नवे वयमर्यादेचे मानक झाले आहे. या प्रवासात सौदी अरेबियाने “हायव्होल्यूशन” नावाची संस्था स्थापन केली आहे. ही संस्था वृद्धत्व कमी करण्यावर, निरोगी आयुष्य वाढवण्यावर आणि वैज्ञानिक संशोधनाद्वारे जीवन अधिक गुणवत्तापूर्ण करण्यावर काम करत आहे. सौदी अरेबियाचे हे यश फक्त आरोग्य सुधारण्यापुरते मर्यादित नाही. हे एक संपूर्ण सामाजिक-आर्थिक परिवर्तन आहे. निरोगी, दीर्घायुषी नागरिक केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठीही हातभार लावतात. २०३० पर्यंत ८० वर्षांचे आयुर्मान गाठण्याचा सौदी अरेबियाचा संकल्प जगातील इतर देशांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण ठरतो आहे.