Saudi Arabia says Efforts Being Made de-escalate tensions India Pak
रियाध: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तान बिथरलेल्या अवस्थेत होते. दरम्यान बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. परंतु भारताने पाकिस्तानचे सर्व उद्देश नाकाम केले. दरम्यान बारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात आहे.
जागतिक स्तरावर अमेरिका, फ्रान्स, जपान, इटली, जर्मनी यांसारख्या प्रमुख देशांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे. या देशांनी भारत आणि पाकिस्तानला शांततेच्या मार्गाने चर्चा करुन लष्करी तणाव कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. याच वेळी सौदी अरेबियाने देखील आपली भूमिका मांडली आहे. सौदी अरेबायाने देखील भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
सौदी अरेबियाने भारत आणि पाकिस्तानला लष्करी संघर्ष संपवण्याचा आवाहन केलं आहे. तसेच संवाद आणि कुटनीतीच्या मार्गाने चर्चा करुन सर्व वाद सोडवण्याचे आवाहने केले आहे. तसेच यासाठी सौदी अरेबिया देखील प्रयत्न करत असल्याचे रियाधने म्हटले आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदीचे परराष्ट्र राज्यमंत्री अदेल-अल जुबैर यांनी 8-9 मे रोजी भारत पाकिस्तान दौरा केला. हा दौर दोन्ही देशातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी होता, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
भारत पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरित्या वाढला असताना सौदी अरेबियाने हे वक्तव्य केले आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तानधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर जुबैर यांनी गुरुवारी (08 मे) नवी दिल्लीला अनऔपचारिक भेट दिली. त्यानंतर शुक्रवारी (09 मे) जुबैर यांनी इस्लामाबादला भेट दिली होती. यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी पुन्हा भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी म्हटले की, भारताने हल्ला केल्यास, आम्हीही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ.
अमेरिका, इटली, जपान, फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपीय संघाने भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडली आहे. G-7 च्या देशांनी भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्याचा आणि संवाद आणि शांततेच्या मार्गाने चर्चा करुन लष्करी संघर्ष कमी करण्याचे आवाहन केले आहेत. तसेच या देशानी पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (LoC) आणि भारताच्या 26 शहरांवर ड्रोन हल्ले केले आहेत. श्रीनगरपासून ते नालियापर्यंत पाकिस्तानने हल्ले केले आहेत.