Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World War III : ‘सापाला डोकं वर काढू देऊ नका’; इराणला चारीमुंड्या चीत करण्यासाठी ट्रम्पसोबत आखाती देशांचीही ‘फिल्डिंग’

Middle East Crisis: इराण युद्धाबाबत आखाती देशांची भूमिका बदलली आहे; सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देश आता इराणची लष्करी ताकद कमकुवत करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला हल्ले सुरू ठेवण्याचे आवाहन करत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 23, 2026 | 12:10 PM
saudi arabia uae joining war against iran israel media claims 2026

saudi arabia uae joining war against iran israel media claims 2026

Follow Us
Follow Us:
  • आखाती देशांची यू-टर्न
  • इराणचा डाव उलटला
  • ओमानची मध्यस्थी

Saudi Arabia UAE stance on Iran War 2026 : मध्य-पूर्वेतील रणसंग्राम (US-Israel Iran War) आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे मैत्री आणि शत्रूची समीकरणे तासातासाला बदलत आहेत. आत्तापर्यंत तटस्थ राहण्याची भूमिका घेणारे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आता इराणविरुद्धच्या संघर्षात मोठी भूमिका बजावू शकतात, असा खळबळजनक दावा इस्रायली प्रसारमाध्यमांनी केला आहे. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या वृत्तानुसार, आखाती देशांच्या भूमिकेत झालेला हा बदल इराणसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

सुरुवातीचा विरोध अन् आताची आक्रमकता: काय बदललं?

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाईचे संकेत दिले होते, तेव्हा सौदी अरेबिया आणि अमिरातीने या युद्धाला कडाडून विरोध केला होता. त्यांना भीती होती की इराण त्यांच्या तेल विहिरी आणि नागरी वस्त्यांवर हल्ले करेल. झालेही तसेच; युद्ध सुरू झाल्यापासून इराणने आपल्या शेजारील देशांवर वारंवार प्रहार केले. मात्र, इराणच्या याच कृतीने आखाती देशांचा विचार बदलला. आता या देशांचे म्हणणे आहे की, “जर इराणकडे शस्त्रे असताना युद्ध थांबले, तर तो भविष्यात अधिक धोकादायक ठरेल. त्यामुळे आता इराणची लष्करी कणाच मोडणे गरजेचे आहे.”

इस्रायली माध्यमांचा ‘तो’ धाडसी दावा

इस्रायली माध्यमांनी चार वरिष्ठ आखाती अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सौदी अरेबिया, यूएई, बहरीन आणि कतार आता अमेरिकेला इराणवर अधिक तीव्र हल्ले करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. इराणची क्षेपणास्त्रे आणि आण्विक क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय मध्य-पूर्वेत शांतता नांदणार नाही, या निष्कर्षापर्यंत हे देश पोहोचले आहेत. ट्रम्प प्रशासनावर युद्धविराम लादण्याऐवजी, हे देश आता इराणला धडा शिकवण्याच्या बाजूने उभे असल्याचे दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : White House: अमेरिकेत शटडाउनने उडाली धांदल; ट्रम्प म्हटले, ‘इराणची डोकेदुखी संपल्यावर, देशातील ‘या’ शत्रूला ठेचणार’

इराणची रणनीती का फसली?

इराणला अशी आशा होती की, सौदी आणि इतर आखाती देशांवर हल्ले केले की हे देश घाबरतील आणि अमेरिकेला युद्ध थांबवण्यास भाग पाडतील. पण इराणचा हा ‘प्रेशर टॅक्टिक’ उलटा फिरला. आखाती देशांना कळून चुकले की इराण केवळ इस्रायलसाठीच नाही, तर त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठीही धोका आहे. एका वरिष्ठ राजनयिकाने स्पष्ट केले की, शस्त्रसज्ज इराण हा प्रदेशासाठी शाप आहे आणि हीच संधी आहे जेव्हा या सापाचे डोके ठेचले जाऊ शकते.

🚨 JUST IN
Saudi Aramco CEO Amin Nasser has pulled out of the CERAWeek conference in Houston due to the Iran war, opting to remain in Saudi Arabia as tensions disrupt global energy markets.
The conflict has already impacted oil flows, forced output cuts, and threatened key… pic.twitter.com/Tbb6cLARcq — Mossad Commentary (@MOSSADil) March 22, 2026

credit – social media and Twitter

ओमानची वेगळी वाट आणि शांततेचा प्रयत्न

सर्वच आखाती देश युद्धाच्या बाजूने नाहीत. ओमानने आजही आपली मध्यस्थाची भूमिका सोडलेली नाही. ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल-बुसैदी यांनी आवाहन केले आहे की, अमेरिका आणि इराणमधील हे शत्रुत्व त्वरित संपायला हवे. ओमानला भीती आहे की हा संघर्ष दीर्घकाळ चालल्यास संपूर्ण प्रदेशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. मात्र, सध्या तरी सौदी आणि यूएईचा आक्रमक पवित्रा ओमानच्या शांततेच्या आवाहनावर भारी पडताना दिसत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: ‘एक पाय कबरमध्ये, दुसरा…’ इराणमध्ये ‘घोस्ट’ राजवट; मोजतबा खामेनींनबाबत CIA आणि Mossad चा ‘हा’ दावा

 भविष्यातील चित्र काय असेल?

सौदी आणि यूएई स्वतः लष्करी रित्या या युद्धात सामील होतील का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, ते अमेरिका आणि इस्रायलला गुप्तचर माहिती आणि रसद पुरवठा करून इराणला खिंडीत गाठण्याची शक्यता दाट आहे. जर आखाती देशांनी इराणची साथ सोडली, तर इराण जगाच्या नकाशावर एकाकी पडेल आणि ट्रम्प यांचा ‘आर्क्टिक ते गल्फ’ असा पसरलेला गेम यशस्वी होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबिया आणि यूएई आता इराणविरुद्ध का झाले आहेत?

    Ans: इराणने शेजारील देशांच्या पायाभूत सुविधांवर वारंवार हल्ले केल्यामुळे, या देशांना आता जाणीव झाली आहे की शस्त्रसज्ज इराण त्यांच्या सुरक्षेसाठी कायमचा धोका आहे.

  • Que: 'द टाइम्स ऑफ इस्रायल'चा मुख्य दावा काय आहे?

    Ans: इस्रायली माध्यमांचा दावा आहे की आखाती देश आता अमेरिका आणि इस्रायलला इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नष्ट करेपर्यंत हल्ले सुरू ठेवण्याचे आवाहन करत आहेत.

  • Que: ओमान या संघर्षात काय भूमिका बजावत आहे?

    Ans: ओमान आजही अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचा आणि राजनैतिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Saudi arabia uae joining war against iran israel media claims 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Saudi Arabia
  • UAE
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Strait Of Hormuz : 2029 पर्यंत बंद राहील होर्मुझ? ट्रम्प कसे अडकले मुज्तबाच्या पटावर; इराणच्या चक्रव्यूहाने अमेरिका हतबल
1

Strait Of Hormuz : 2029 पर्यंत बंद राहील होर्मुझ? ट्रम्प कसे अडकले मुज्तबाच्या पटावर; इराणच्या चक्रव्यूहाने अमेरिका हतबल

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?
2

Baba Vanga : अरे बापरे! २०२६ संपायला ४ महिने बाकी; बाबा वेंगांच्या २ भविष्यवाणी खऱ्या ठरल्या? उर्वरित ३ भाकितांवर काय होणार?

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण
3

Islamic NATO: धर्मापेक्षा राष्ट्रीय हित श्रेष्ठ! पाकिस्तानच्या जाळ्यात अडकण्यास इजिप्तचा ठाम नकार; जाणून घ्या पडद्यामागचे राजकारण

US-Iran: जागतिक महासत्तांमध्ये सत्तानाट्य! इराण-अमेरिकेत सत्ता केंद्रस्थानी नवे चेहरे; मोहसेन रझाई अन् विल शार्फ महत्वाच्या पदांवर
4

US-Iran: जागतिक महासत्तांमध्ये सत्तानाट्य! इराण-अमेरिकेत सत्ता केंद्रस्थानी नवे चेहरे; मोहसेन रझाई अन् विल शार्फ महत्वाच्या पदांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.