Saudi Arabia's 'Sleeping Prince' dies After Nearly 20 Years In Coma
एक मोठी बातमी समोर आली आहे. सौदी अरेबियाचे प्रिन्स अल वालिद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे शनिवारी (१९ जुलै) निधन झाले आहे. त्यांना Sleeping Prince म्हणूनही ओळखले जात होते. २० वर्षांपासून ते कोमात होते. प्रिन्स अल-वालिद बिन खालिद बिन तलाल यांची जीवनाची कहाणी अत्यंत हृदयद्रावर आहे. २००५ मध्ये लंडनमध्ये त्यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून ते आजतागायत कोमात होते, म्हणजे जवळपास गेल्या २० वर्षांपासून ते कोमात होते. दरम्यान त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनाने संपूर्ण जगभर हळहळ उडाली आहे.
प्रिन्स अल-वालिद बिन खालिद बिन तलाल यांचा २००५ मध्ये लंडनमध्ये भीषण अपघात झाला होता. यावेळी प्रिन्स लंडनमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत होते. या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. अंतर्गत रक्तस्रावर झाल्याने ते गेल्या २० वर्षांपासून कोमात होते.
प्रिन्सला सौदी अरेबियातील किंग अब्दुल अझीझ मेडिकल सिटी, रियाध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रिन्स ला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना लाईफ सपोर्ट सिस्टीम हटवण्याचा सल्ला दिली होती.
त्यांच्या कुटुंबाने कधीच हार मानली नव्हती. प्रिन्सच्या उपचारासाठी अमेरिका आणि स्पेनमदील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देखील बोलावण्यात आली होती. परंतु प्रिन्स शुद्धीवर आलेच नाहीत. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय दृष्ट्या मृत घोषित केले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रिन्सचे उपचार सुरुच ठेवला. त्यांना आशा होती की, राजकुनार एक दिवस नक्की बरे होतील.
प्रिन्स अल-वालिद बिन खालिद बिन तलाल यांच्या वडिलांचा विश्वास होता ही जीवन ही अल्लाहची देणगी आहे. फक्त अल्लाह ती हिरावून घेऊ शकतो. यामुळे प्रिन्सवर त्यांच्या कुटुंबीयांना उपचार सुरु ठेवले होते.
२०१९ मध्ये प्रिन्सच्या बोटांची आणि डोक्याची थोडी हालचाल झाली होती. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत भावुक होता. परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारे त्यांच्या प्रकृतीत सुधार झाली नाही. दरम्यान त्यांचे निधन झाले असून कुटुंबावर दु:खाचे संकट कोसळले आहे.
प्रिन्स अल-वालिद बिन खालिद बिन तलाल अनेक वेळा सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले आहेत. यामध्ये प्रिन्सच्या शरीराची थोडीफार हालचाल होताना लोकांना पाहायला मिळाली. यामुळे अनेकांना प्रिन्स शुद्धीवर येतील अशा आशा होती.