Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Vs UAE : तेलासाठी पेटलं आखात! युएई घेणार सौदी अरेबियाचा बदला; 24 तासांत रियाधविरुद्ध तयार केले दोन वॉर फ्रंट

Saudi Vs UAE: येमेनमध्ये सौदी अरेबिया आणि युएईमधील तणाव वाढत आहे. एकीकडे, सौदी अरेबियाने हद्रामौत आणि अल-महरा सारख्या तेल आणि वायू समृद्ध भागातून युएई समर्थित एसटीसीला मागे हटवले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 08, 2026 | 02:25 PM
saudi uae conflict yemen stc leader escape israeli base saudi border 2026

saudi uae conflict yemen stc leader escape israeli base saudi border 2026

Follow Us
Close
Follow Us:
  •  सौदी अरेबियाने येमेनमध्ये युएई समर्थित सैन्याला मागे ढकलल्यानंतर, युएईने सौदीच्या सीमेजवळ इस्रायली लष्करी तळ आणि ‘मोसाद’सोबत गुप्तचर सहकार्याचे दोन नवीन मोर्चे उघडले आहेत.
  •  देशद्रोहाचे आरोप असलेले दक्षिण येमेनचे नेते आयड्रोस अल-जुबैदी रात्रीच्या अंधारात बोटीने सोमालियाला आणि तिथून युएईच्या लष्करी विमानातून अबू धाबीला पळून गेले आहेत.
  •  सौदीने हद्रामौत आणि अल-महरा हा तेलसमृद्ध भाग पुन्हा ताब्यात घेतल्याने संतापलेल्या युएईने सौदीच्या ‘रेड लाईन’ ओलांडण्यास सुरुवात केली असून दोन्ही देशांमधील दशकांचा मित्रत्वाचा काळ संपल्याचे दिसत आहे.

Saudi UAE tensions Yemen 2026 news : एकेकाळी घनिष्ठ मित्र असलेले सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनण्याच्या मार्गावर आहेत. येमेनच्या तेल आणि वायू समृद्ध भागावरून सुरू झालेला हा संघर्ष आता केवळ येमेनपुरता मर्यादित राहिला नसून, थेट सौदीच्या सीमांपर्यंत पोहोचला आहे. सौदी अरेबियाने युएई समर्थित फुटीरतावादी संघटना ‘एसटीसी’ (STC) ला हद्रामौत प्रांतातून हाकलून लावल्यानंतर, युएईने आता सौदीच्या सुरक्षेला थेट आव्हान देणारी रणनीती आखली आहे.

सौदी सीमेवर इस्रायली लष्करी तळाची भीती?

सौदी माध्यमांनी दिलेल्या खळबळजनक वृत्तानुसार, युएई आता सौदी अरेबियाच्या सीमेजवळील ‘अरादा’ (Arada) प्रदेशात एक मोठा लष्करी तळ उभारण्याच्या तयारीत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या तळावर युएईचे नाही तर ८०० इस्रायली सैनिक तैनात असण्याची शक्यता आहे. इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ आणि युएई यांच्यातील वाढते सहकार्य हे सौदी अरेबियासाठी धोक्याची घंटा मानले जात आहे. जर हा तळ उभारला गेला, तर सौदीच्या अंगणात इस्रायलचा थेट शिरकाव होईल, जे रियाधला कधीही मान्य नसेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

आयड्रोस अल-जुबैदी: रात्रीच्या अंधारात ‘मोस्ट वाँटेड’ नेत्याचे पलायन

येमेनमध्ये गुरुवारी एका नाट्यमय घटनेची नोंद झाली. दक्षिण संक्रमणकालीन परिषदेचे (STC) प्रमुख आयड्रोस अल-जुबैदी, ज्यांच्यावर येमेन सरकारने ‘देशद्रोहा’चा ठसा उमटवला आहे, ते सौदीच्या तावडीतून निसटून अबू धाबीला पोहोचले आहेत. सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने दावा केला आहे की, जुबैदी बुधवारी रात्री एडन बंदरातून एका मालवाहू जहाजातून सोमालीलँडच्या बर्बेरा बंदरात पोहोचले. तिथून युएईच्या एका खास लष्करी विमानाने (IL-76) त्यांची ओळख लपवून त्यांना अबू धाबीच्या अल-रीफ लष्करी तळावर नेण्यात आले. या पलायनामुळे सौदी अरेबिया प्रचंड संतापला असून त्यांनी युएईवर ‘गुन्हेगाराला आश्रय’ दिल्याचा आरोप केला आहे.

🚨 🇸🇦 Coalition confirms STC Chief fled #Aden by boat overnight Jan 7 to Berbera 🇸🇴, then flew to Abu Dhabi 🇦🇪 🔹 BAMEDHAF turned AIS off
🔹 Arrived Berbera ~1200
🔹 UAE Joint Ops Commander 📞
🔹 Via Mogadishu → Al-Reef Air Base
The message: “Our proxies aren’t disposable.” https://t.co/waaD5368OA pic.twitter.com/qiAn9tyVxN — Ibrahim Jalal | إبراهيم جلال (@IbrahimJalalYE) January 8, 2026

credit : social media and Twitter

हद्रामौत आणि अल-महराचा वाद काय आहे?

येमेनमधील हद्रामौत आणि अल-महरा हे प्रांत तेल आणि नैसर्गिक वायूने समृद्ध आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये युएई समर्थित एसटीसीने या भागावर ताबा मिळवून ‘स्वतंत्र दक्षिण येमेन’ची घोषणा केली होती. मात्र, ३० डिसेंबर रोजी सौदी अरेबियाने हवाई हल्ले आणि आपल्या लष्करी शक्तीच्या जोरावर हा भाग पुन्हा येमेनच्या अधिकृत सरकारच्या ताब्यात दिला. सौदीच्या मते, त्यांच्या सीमेजवळ कोणत्याही लष्करी टोळीचे नियंत्रण असणे त्यांच्या ‘राष्ट्रीय सुरक्षे’साठी धोकादायक आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?

आखाती देशांमधील नात्याचा शेवट?

युएईने आता अधिकृतपणे येमेनमधून आपले ‘दहशतवादविरोधी अभियान’ संपवण्याची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्यांनी सौदीच्या विरोधात गनिमी कावा सुरू केला आहे. मोसादसोबतचे गुप्तचर करार आणि सौदी सीमेजवळील लष्करी हालचाली हे सूचित करतात की, युएई आता सौदीच्या वर्चस्वाला जुमानत नाही. तज्ज्ञांच्या मते, आखातातील या दोन महासत्तांमधील हा संघर्ष संपूर्ण पश्चिम आशियाची शांतता भंग करू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सौदी अरेबिया आणि युएईमध्ये येमेनमध्ये वाद का सुरू आहे?

    Ans: मुख्यत्वे येमेनच्या तेलसमृद्ध 'हद्रामौत' आणि 'अल-महरा' प्रांतावर ताबा मिळवण्यासाठी हा वाद आहे. सौदी तिथे आपले समर्थक सरकार पाहू इच्छिते, तर युएई तिथे एसटीसी (फुटीरतावादी) गटाला पाठिंबा देत आहे.

  • Que: आयड्रोस अल-जुबैदी कोण आहेत आणि ते का पळून गेले?

    Ans: अल-जुबैदी हे दक्षिण येमेनच्या फुटीरतावादी गटाचे (STC) प्रमुख आहेत. त्यांच्यावर येमेन सरकारने देशद्रोहाचा आरोप लावल्यानंतर आणि सौदीने त्यांना अटक करण्याची तयारी केल्यावर ते युएईच्या मदतीने पळून गेले.

  • Que: युएई सौदी सीमेवर इस्रायली तळ का बांधत आहे?

    Ans: युएईला सौदी अरेबियाने येमेनमध्ये दिलेल्या लष्करी धक्क्याचा बदला घ्यायचा आहे. इस्रायलशी लष्करी सहकार्य वाढवून युएईला सौदीवर दबाव निर्माण करायचा आहे.

Web Title: Saudi uae conflict yemen stc leader escape israeli base saudi border 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • International Political news
  • Saudi Arabia
  • third world war
  • UAE

संबंधित बातम्या

World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?
1

World War 3: ब्रिटनच्या आकाशात ‘मृत्यूचे दूत’! विमानतळावर उतरली डझनभर सशस्त्र अमेरिकन विमाने; कोणता देश रडारवर?

World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी
2

World War 3: अटलांटिक महासागरात सुरू होणार महायुद्ध? अमेरिकेने रशियन तेल टँकर खेचून नेला; रशियाची थेट अणुहल्ल्याची धमकी

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका
3

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका

World War 3 : ‘हिम्मत तर करा,आम्ही हातच कापून टाकू’ America च्या धमक्यांना Iran लष्करप्रमुख हतामींचे कडक शब्दांत प्रत्युत्तर
4

World War 3 : ‘हिम्मत तर करा,आम्ही हातच कापून टाकू’ America च्या धमक्यांना Iran लष्करप्रमुख हतामींचे कडक शब्दांत प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.