Shubhanshu Shukla Earth Return Astronaut Shubhanshu Shukla returned to Earth safely, Mission 'Axiom-4' successful
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे मिशन ‘अॅक्सिओम-४’ यशस्वी झाले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला आपल्या टीमसह पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहचणारे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर दुसरे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ठरले आहेत.
शुभांशू शुक्ला यांचे अंतराळयान पृथ्वीवर सरक्षितपणे उतरले आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील समुद्रात अंतराळयानाचे स्प्लॅशडाऊन करण्यात आले. अंतराळयान समुद्रात लॅंड होताच संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शुभांशू शुक्ला यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळात आहे.
भारतासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला १८ दिवसांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर परतले आहे. सध्या सर्व अंतराळवीरांना समुद्रातून बाहेर काढले जात आहे.
#WATCH | Axiom-4 Mission | Lucknow, UP: Group Captain Shubhanshu Shukla’s family rejoices and celebrates as he and the entire crew return to the earth after an 18-day stay aboard the International Space Station (ISS) pic.twitter.com/S8TuJk95D7
— ANI (@ANI) July 15, 2025
शुभांशू शुक्ला आपल्या चार सहकारी अंतराळवीरांसह ‘अॅक्सिओम-४’ मिशनसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. २५ जून रोजी त्यांनी आपल्या टीमसह अंतराळात उड्डाण केले होते. या मिशनसाठी नासाचे अंतराळवीर आणि अक्सिओम मिशनचे कमांडर पेही व्हिटसन, भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला, मिशन तज्ज्ञ पोलंडचे स्लावोज उजनांस्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश होता.
१८ दिवसांच्या या प्रवासात शुभांशू शुक्ला यांनी ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले आहेत. यामध्ये भारताच्या सात प्रयोगांचा समावेश होता. शुभांशू शुक्ला यांनी मेथीबीनचे, हाडांचे आरोग्य, मायक्रोअल्गी आणि इतर महत्त्वपूर्ण प्रयोग केले आहे. यामुळे भारताचे मान गौरवाने उंचावली आहे.
अॅक्सिओम-४ मोहिमेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग करण्यात आले आहेत. यामध्ये बायोमेडिकल संशोधनासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. यावर अंतराळात सूक्ष्म शैवालांचा अभ्यास करण्यात आला, तसेच अन्न आणि जीवन प्रणालींच्या स्त्रोतांचाही शोध घेण्यात आला.
तसेच नॅनोमटेरियल्सचाही अभ्यास करण्यात आला. यामुळे वेअरेबल उपकरणांच्या विकासात मदत होते. या उपकरणांमुळे अंतराळातील क्रू मेंबर्सच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येऊ शकते. याशिवाय अंतराळात विद्युत स्नायू उत्तेजना, थर्मल कम्फर्ट सूट मटेरियलची चाचणी आणि क्रू मेंबर्सच्या वर्तणुकीचा अभ्यासही करण्यात आला आहे.
शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या पूर्ण टीमला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. यानंतर त्यांना सात दिवसासाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. यामुळे शुभांशू शुक्ला आणि त्यांच्या टीमचे शरीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेसाठी तयार होईल.