Shubhanshu Shukla Return How is the return of astronauts to Earth planned Why is the spacecraft landing in the sea
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून परतले आहे. त्यांनी ‘अॅक्सिओम-४’ हे १८ दिवसांचे मिशन पूर्ण केले आहे. ही भारतासाठी अत्यंत अभिमानस्पद आणि महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. कारण ४१ वर्षानंतर पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यानंतर ISS वर जाणारे शुभांशू शुक्ला दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहे. त्यांच्या ड्रॅगन कॅप्सूलचे लॅंडिग कॅलिफोर्नियाच्या समुद्रात सुरक्षितपणे करण्यात आले आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का, अंतराळवीरांच्या परत येण्याची योजना कशी आखली जाते. ड्रॅगन कॅप्सूल कसे आणि कुठे उतरवायचे हे कसे ठरवले जाते? आणि कॅप्सूलचे लॅंडिंग समुद्रातच का केले जाते. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, मिशनचे लॅंडिंगचे ठिकाणी उड्डाणपूर्वीचे निश्चित केले जाते. आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) पृथ्वीभोवती २८ हजार किमी प्रती तासाच्या वेगाने फिरते असते. यामुळे आयएसएसवरुन पृथ्वीवर परत येण्यासाठी अचूनक गणित, वेळ आणि अंशाचे नियोजन केले जाते. यामध्ये थोडीशी चूक झाली तर लॅंडिग साईट शेकडो किमी दूर जाऊ शकते.
याशिवाय लॅंडिंगदरम्यान अचानक स्फोट देखील होऊ शकतो. यामुळे नासा आणि इतर संस्था याचे एंट्रीन बर्न, डी-ऑर्बिट, डी-ऑर्बिट बर्न सर्व गोष्टींचे वेळ, दिशासूचक कोन आणि हवामानाचा अंदाज घेतात. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच लॅंडिग कुठे करायचे कसे करायचे आणि कधी सर्व सुनियोजित केले जाते.
यापूर्वी केवळ रशियाच्या soyuz मिशनचे वाळवंटात यशस्वी लॅंडिग करण्यात आले होते. परंतु यानंतर सर्व स्पेस एजन्सीने समुद्रात लॅंडिंग जास्त सुरक्षित, प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य असल्याचे मान्य केले. त्यानंतर केवळ समुद्रातच अंतराळयानाचे लॅंडिंग केले जाते.