Small plane crashes in Pennsylvania, VIDEO
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाच जणांना घेऊन जात असलेले एक छोटेसे विमान अचानक कोसळले. मीडिया रिपोर्टनुसार, बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांच्या मते, पेनसिल्व्हेनियाच्या उपनगरी भागात विमानतळाबाहेर हे विमान कोसळे आणि यामुळे जवळपास असलेल्या गाड्यांनी पेट घेतला. सुदैवान पाचही प्रवासी सुखरुप बचावले, मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस 75 मैल (120 किमी) अतंरावर मॅनहाइम टाउनशिपमदील ब्रेथेन येथे दुपारी 3 वाजता ही दुर्घटना घडली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शनींच्या मते, विमान अचानक डावीकडे वळले आणि वेगाने खाली पडले. यानंतर आगीचा भडका उडाला. सध्या याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये विमान पडलेल्या ठिकाणीच्या गाड्यांनाही आग लागली आहे. तसेच ढिगाऱ्यातून काळा धूर निघत असल्याचे दिसत आहे. या अघातात बाजूला असेलेली तीन मजली इमारत थोडेक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले.
🚨 #Update , a Beechcraft Bonanza carrying five people crashed in Manheim Township, Pennsylvania, near Lancaster Airport at 3:00 PM, the FAA confirmed per NBC10 and Lancaster Online. The small plane went down in the parking lot of Brethren Village Retirement Community. pic.twitter.com/8sU0IBT1qf
— PitunisWorld 🌎 (@ScMesab) March 9, 2025
यानंतर अतिरिक्त आपत्कालीन पथके देखील आली. तीव्र उष्णता आणि दुरामुळे अग्निशमन दलाच्या पथकाला आग आटोक्यात आणणे कठी झाले होते. या अपघातात सुमारे एक डझन वाहनांचे नुकसान झाले. सध्या या अपघताची चौकशी सुरु आहे. फेडरल एव्हिएशन ॲडमिनिसट्रेनशन अपघाताची चौकशी करणार आहे.
विमान अपघातांचे सत्र सुरुच
जानेवारीपासून अमेरिकेत विमान अपघातांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवासंमध्ये अमेरिकेत चार मोठ्या विमान अपघातांच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. अमेरिकेच्या एरिझोन राज्यात दोन लाहन विमानंचा अपघात झाला. ही दोन लहान विमान एकमेकांना हवेतच धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
नुकतेच एक डेल्टा जेट विमानसा टोरोंटो विमानतळावर लॅंडिगदरम्यान अपघात झाला. सुदैवाने यातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप बचावले. याशिवाय, अलास्कामध्येही एक विमान अपघात झाला होता. यापूर्वी वॉशिंग्टन डीसीच्या अमेरिकन एअरलाइन्सट्या प्रवासी विमानाला अमेरिक सैन्याच्या विमानाची धडक बसली होती, यात 67 जणांचा मृत्यूची नोंद झाली होती.
विमान उद्योग आणि सुरक्षा यंत्रमा चिंतेत
गेल्या काही महिन्यांत वारंवार विमान अपघात झाल्यामुळे अमेरिकेतील विमान उद्योग आणि सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. या घटनांमुळे विमान सुरक्षा नियम अधिक कठोर करण्यावर भर दिला जात आहे. उत्तर अमेरिका आणि जागतिक पातळीवर हवाई वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चर्चा वाढल्या आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी अधिक काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत.