
South Africa arrests Bangladeshi citizens who arrived on fake visas
दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू
दक्षिण आफ्रिकेचा देश इथिओपियाच्या एअरलाइन्सने बनावट व्हिसावर प्रवास करणाऱ्या १६ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सर्व पुरुषांचा समावेश असून त्यांना लवकरच हद्दपार केले जाणआर आहे. सीमा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांनी मानवी तस्करीचा संशयही व्यक्त केला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या माहितीचे विश्लेषण आणि त्यांच्या संशायस्पद हालचालींमुळे त्यांना ओळखण्यात आले. विमानतळावर पासपोर्ट तपासणीवेळी या बांगलादेशी नागरिकांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवाशांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. परंतु काही अधिकाऱ्यांना या संशयास्पद हालचाली लक्षात येताच चौकशी करण्यात आली. या चौकशीतून हे बांगलादेश नागरिक बनावट व्हिसावर दक्षिण आफ्रिकेत आल्याचे उघड झाले. यानंतर सीमा कायदा अंमलबाजवणी विभाग याची सखोल चौकशी करत आहे. प्रवासासाठी दाखवलेली कारणे पूर्णपणे खोटी असल्याने मानवी तस्करी संशय निर्माण झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सीमा विभागाचे अधिकारी सध्या या प्रकरणाची कडक तपासणी करत आहेत. प्राथमिक तपासानुसार, या टोळ्या दक्षिण आफ्रिकेत वारंवार ट्रान्झिट पाइंटचा वापर करत आहेत. बेकायदेशीरपणे दक्षिण आफ्रिकेत अशा प्रकारे घुसखोरीची ही पहिलीच वेळ नाही. सध्या या प्रवाशांना चौकशीनंत हद्दपार केले जाणार आहे. तसेच यामागे असलेल्यांना १५,००० रॅंडचा दंड आकारला जाणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेतील एअरलाइन्स अलर्टवर असून सर्व प्रवाशांच्या कागपत्रांची कडक तपासणी केली जात आहे.
बांगलादेश, भारत आणि पाकिस्तान सारख्या देशांमधून बेकायदेशीरपणे परदेशी देशांमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढत आहे. यावर दक्षिण आफ्रिकेने चिंता व्यक्त केला आहे. सोमालिया आणि इथिओपियाच्या काही देशांमधून देखील अशी प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिकेत अंदाजे ३,५०, ००० हून अधिक बांगलादेशी वंशाचे लोक राहतात.
Ans: