Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Space Puffin : स्कॉटलंड आणि जपानमधील संशोधक अंतराळातील अत्यंत कठीण वातावरणात स्कॉच व्हिस्कीचे नमुने पाठवणार आहेत. तेथील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि तापमानातील तीव्र बदलांचा व्हिस्कीच्या 'एजिंग' प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे या प्रयोगातून तपासले जाणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 08, 2026 | 08:23 PM
Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Space Puffin : अंतराळात व्हिस्की का पाठवणार? ‘स्पेस पफिन’ मिशनमागचं भन्नाट विज्ञान; जाणून घ्या प्रयोगाचं रहस्य!

Follow Us
Follow Us:
  • महत्त्वाकांक्षी आहे ‘स्पेस पफिन’ मिशन
  • ओकच्या लाकडाच्या तुकड्यावर होणार प्रयोग
  • सॅटेलाइटमधून थेट पृथ्वीवर डेटा
अंतराळ म्हटलं की उपग्रह, टेलिस्कोप आणि परग्रहावरील जीवनाचा शोध असे विषय आपल्या डोळ्यांसमोर येतात. मात्र, यावेळी वैज्ञानिकांचा प्रयोग काहीसा वेगळा आहे. स्कॉटलंड आणि जपानमधील संशोधक अंतराळातील अत्यंत कठीण वातावरणात स्कॉच व्हिस्कीचे नमुने पाठवणार आहेत. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) आणि तापमानातील तीव्र बदलांचा व्हिस्कीच्या ‘एजिंग’ प्रक्रियेवर काय परिणाम होतो, हे या प्रयोगातून तपासले जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘स्पेस पफिन’ (Space Puffin) असे नाव देण्यात आले आहे. 2028 मध्ये प्रस्तावित या मोहिमेत एक छोटा क्यूबसॅट अंतराळात पाठवला जाणार आहे. या उपग्रहामध्ये व्हिस्कीचे छोटे नमुने तसेच व्हिस्कीच्या निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे नमुने ठेवले जाणार आहेत.

‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय आहे?

ग्लासगो विद्यापीठातील डॉ. गाइल्स बैलेट यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. स्कॉटलंड आणि जपानमधील अभियंते, रसायनशास्त्रज्ञ आणि विद्यार्थी या संशोधनात सहभागी आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, 2028 मध्ये स्पेसएक्सच्या कार्गो सप्लाय मिशनद्वारे हा क्यूबसॅट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत (ISS) नेला जाण्याची योजना आहे. त्यानंतर जपानी एक्सपेरिमेंट मॉड्यूलच्या माध्यमातून क्यूबसॅट पृथ्वीच्या कक्षेत सोडला जाईल. हा उपग्रह सुमारे पाच वर्षे पृथ्वीभोवती फिरत असताना व्हिस्कीवर प्रयोग सुरू ठेवेल

Measles vaccine : बांगलादेशात गोवराचा उद्रेक, 32 हजारांहून अधिक संशयित रुग्ण, भारताबाबत काय परिस्थिती?

ओकच्या लाकडाचा छोटा तुकडा, मोठा प्रयोग

पृथ्वीवर व्हिस्कीला परिपक्व करण्यासाठी ती ओकच्या लाकडी पिंपांमध्ये अनेक वर्षे साठवली जाते. या काळात लाकूड आणि स्पिरिट यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते. त्यातून व्हिस्कीला विशिष्ट रंग, चव आणि सुगंध मिळतो.

अंतराळात मोठे आणि वजनदार पिंप पाठवणे तांत्रिक तसेच आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक असल्याने संशोधकांनी वेगळी पद्धत निवडली आहे. क्यूबसॅटमध्ये विशेष चेंबर तयार करण्यात येणार असून, त्यात कमी प्रमाणातील स्पिरिट ओकच्या लाकडाच्या छोट्या तुकड्यांच्या संपर्कात ठेवले जाईल.

क्यूबसॅट सुमारे 90 मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. त्यामुळे त्याला अंतराळातील अत्यंत वेगवेगळ्या तापमानांचा सामना करावा लागेल. या तापमानातील बदलांमुळे लाकूड वेगाने आकुंचन-पसरण करू शकते. परिणामी लाकूड आणि व्हिस्की यांच्यातील रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढतो का, याचा अभ्यास केला जाणार आहे.

Felix Finkbeiner : एका चॉकलेटने लावली 1 कोटी झाडे; जर्मनीतील ‘या’ शाळकरी मुलाने कशी घडवून आणली जगभरात वृक्षारोपणाची महाक्रांती?

या प्रयोगामागचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे. पृथ्वीवर व्हिस्कीला परिपक्व होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. अंतराळातील परिस्थितीमुळे ही रासायनिक प्रक्रिया वेगवान होत असेल, तर भविष्यात कमी कालावधीत विशिष्ट चव आणि सुगंध असलेली व्हिस्की तयार करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

डॉ. गाइल्स बैलेट यांच्या मते, अंतराळातील बदलांचा लाकडावर होणारा परिणाम आणि त्यातून व्हिस्कीच्या ‘एजिंग’ प्रक्रियेत होणारे बदल समजून घेणे हा प्रयोगाचा मुख्य उद्देश आहे.

सॅटेलाइटमधून थेट पृथ्वीवर डेटा

हा केवळ व्हिस्की अंतराळात पाठवण्याचा प्रयोग नसून एक अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन प्रकल्प आहे. क्यूबसॅटमध्ये बसवण्यात येणारे सेन्सर्स व्हिस्कीच्या रंगातील बदल, रासायनिक रचना आणि आण्विक पातळीवरील बदलांचा अभ्यास करतील. या प्रयोगातून मिळणारा डेटा पृथ्वीवरील संशोधन केंद्रांकडे पाठवला जाणार आहे.

या संशोधनामुळे व्हिस्कीच्या परिपक्वतेमागील रासायनिक प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होऊ शकते. भविष्यात अंतराळातील वातावरणात परिपक्व केलेल्या व्हिस्कीची स्वतंत्र आणि प्रीमियम श्रेणी निर्माण होण्याची शक्यताही संशोधकांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Space puffin mission scotch whisky space aging experiment rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • Japan
  • Space

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये  रंगणार स्पर्धा
1

Asian Games 2026 : Bye Bye Japan, 20 व्या आशियाई स्पर्धेची सांगता, आता ‘या’वर्षी दोहामध्ये रंगणार स्पर्धा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.