Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :नागपूर परिमंडळाचे ‘थलाई कुथल’ प्रथम; राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा

Nagpur News : महावितरणच्या पुण्यात पार पडलेल्या 'नाट्यबहार' राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडळाच्या 'थलाई कुथल' नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूरच्या 'समोरच्या घरात' नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत चार प्रादेशिक विभागांनी सहभाग घेतला.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 02:39 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दोन दिवस रंगला नाट्यकलेचा आविष्कार
  • मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
  • स्पर्धेचा निकाल
Nagpur News : महावितरणच्या ‘नाट्यबहार’ आंतरप्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडळाने आपल्या अभिनयाची आणि नाट्यकलेची छाप उमटवली आहे. नागपूरच्या ‘थलाई कुथल’ या नाटकाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा बहुमान मिळवला.

तर कोल्हापूर परिमंडळाच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. पुण्यात पार पडलेल्या या स्पर्धेत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित नाटकांतून आपले कलागुण सादर केले.

दोन दिवस रंगला नाट्यकलेचा आविष्कार

पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा चार प्रादेशिक विभागांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी कोकण विभागाचे ‘ओल्या भिंती’ आणि पुणे विभागाचे ‘समोरच्या घरात’ ही नाटके सादर झाली.

दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर विभागाने ‘वारी’, तर नागपूर विभागाने ‘थलाई कुथल’ हे नाटक सादर केले. चारही नाटकांमधून सामाजिक प्रश्न, मानवी भावना आणि विविध विषयांवर भाष्य करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजातून वेळ काढत रंगभूमीवर सादर केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली.

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!

मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आयोजित बक्षीस वितरण सोहळ्याला महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक परेश भागवत, अंकुर कावळे, पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे आणि नागपूर प्रादेशिक संचालक राजेश नाईक उपस्थित होते. यावेळी समन्वयक तथा मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आणि प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांचीही उपस्थिती होती.

परीक्षक म्हणून राज काझी, अजय धनवे, शुभांगी पाठक आणि राज कुबेर यांनी काम पाहिले. त्यांच्या परीक्षणानंतर नागपूरच्या ‘थलाई कुथल’ नाटकाला प्रथम, तर कोल्हापूरच्या ‘समोरच्या घरात’ या नाटकाला द्वितीय क्रमांक जाहीर करण्यात आला.

मृदुला शिवदे आणि भक्ती जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या स्पर्धेच्या माध्यमातून महावितरणच्या कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळाले. केवळ वीजसेवेपुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक क्षेत्रातही कर्मचारी आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात, हे नागपूरच्या यशाने अधोरेखित केले.

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

स्पर्धेचा निकाल

सर्वोत्कृष्ट नाट्यनिर्मिती:
प्रथमः थलाई कुथल’ (नागपुर परिमंडळ)
द्वितीयः ‘समोरच्या घरात’ (कोल्हापूर परिमंडळ)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: प्रथमः प्रफुल्ल लांडे (‘थलाई कुथल’)
द्वितीयः अमित बोकील (‘समोरच्या घरात’)
सर्वोत्कृष्ट अभिनय (अभिनेता): प्रथमः जयतीर्थ सांगलीकर (श्रीरंग विजयकर यांची भूमिका – ‘समोरच्या घरात’)
द्वितीयः असित रामटेके (अण्णा यांची भूमिका *थलाई कुथल)
सर्वोत्कृष्ट अभिनय
(अभिनेत्री): प्रथमः श्वेता सांगलीकर (अनुराधा यांची भूमिका ‘समोरच्या घरात’)

Web Title: Nagpur divisions thalai kuthal takes first place state level drama competition cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi new
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं
1

Imran Khan Ex-Wife Jemima Married: “वेगळं होण्याचा निर्णय त्याचाच होता…” इमरान खानच्या एक्स पत्नीने मौन सोडलं

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल
2

Suraj Chavan Welcomes Daughter: Bigg boss फेम सूरज चव्हाणच्या लेकीचं थाटात स्वागत! चिमुकल्या राधासाठी घर सजवलं, व्हिडिओ व्हायरल

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती
3

Nagpur News :उच्च न्यायालयात खुलासा; ६ कोटींचा माल जप्त ;अज्ञात कारखान्यात नायलॉन मांजाची निर्मिती

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा
4

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.