Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा भारत दौरा; ‘गार्ड ऑफ ऑनर’ने पंतप्रधान मोदींनी केले स्वागत, या मुद्द्यांवर झाली चर्चा

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके त्यांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 16, 2024 | 04:59 PM
श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा पहिला भारत दौरा; 'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींनी केले स्वागत, या मुद्द्यांवर झाली चर्चा

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा पहिला भारत दौरा; 'गार्ड ऑफ ऑनर'ने पंतप्रधान मोदींनी केले स्वागत, या मुद्द्यांवर झाली चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके त्यांच्या भारत दौऱ्यावर आहेत. काल दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिला परदेश दौरा असून ते 15 ते 17 डिसेंबरदरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांनी त्यांनी विदेश दौऱ्यासाठी पहिल्यांदा भारताची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

भारत-श्रीलंका भागीदारीला “फ्युचरिस्टिक व्हिजन”

पंतप्रधान मोदींनी यांनी म्हटले की, श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा भारतात स्वागत करताना मला आनंद होत आहे. राष्ट्रपती म्हणून त्यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड केली, हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.” पंतप्रधानांनी भारत-श्रीलंका भागीदारीला “फ्युचरिस्टिक व्हिजन” म्हणून ओळखले.

त्यांनी आर्थिक सहकार्य, गुंतवणूक-आधारित विकास आणि डिजिटल, भौतिक आणि ऊर्जा क्षेत्रांतील कनेक्टिव्हिटीवर भर दिला. दोन्ही देशांनी इलेक्ट्रिसिटी ग्रिड कनेक्टिव्हिटी, मल्टी प्रॉडक्ट पेट्रोल पाइपलाइन आणि सोलर प्रोजेक्ट्सच्या मुद्द्यांवल चर्चा केली. यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा जागतिक स्तरावर परिणाम; मात्र ‘या’ देशांना झाला मोठा फायदा, भारताचे नाव यादीत आहे का?

राष्ट्रपती दिसानायके यांनी राजघाट येथे महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली

सोमवारी सकाळी राष्ट्रपती दिसानायके यांनी महात्मा गांधींच्या राजघाट येथील स्मारकाला भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्रीय राज्यमंत्री एल. मुरुगन त्यांच्या सोबत होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या शाश्वत तत्त्वांनी जगभरातील मानवतेला प्रेरणा दिली आहे.

During my official visit to India, I had the privilege of engaging in productive discussions with Finance Minister @nsitharaman, External Affairs Minister @DrSJaishankar, and National Security Advisor Shri Ajit Doval. Our conversations focused on strengthening Indo-Sri Lanka… pic.twitter.com/A5mkZ4TS1D

— Anura Kumara Dissanayake (@anuradisanayake) December 15, 2024


अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट 

दिसानायके यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांच्याशीही भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी आर्थिक सहकार्य, गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, प्रादेशिक सुरक्षा मजबूत करणे, पर्यटन आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांवर चर्चा केली.

तसेच, जयशंकर यांनी ‘नेबर फर्स्ट पॉलिसी’ आणि ‘सागर दृष्टिकोना’मध्ये श्रीलंकेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती दिसानायके यांच्या चर्चेमुळे भारत-श्रीलंका सहकार्याला नवीन उंची मिळेल. या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- नेतन्याहूंनी साधला ट्रम्प यांच्याशी संवाद; सीरियासोबत इराणवरही हल्ला करणार इस्त्रायल? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Sri lankan presidents first visit to india pm modi welcomed him with a guard of honour nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • india
  • narendra modi

संबंधित बातम्या

IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी
1

IRIGC-TEC Meeting : जागतिक शक्तींना भारत-रशियाचा नवा मेसेज! जयशंकर-मंटुरोव्ह यांची ‘अभूतपूर्व करारा’वर स्वाक्षरी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
2

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
3

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय
4

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.